Weight Loss Tips | आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच लोकांमध्ये वजन वाढण्याची, लठ्ठ होण्याची समस्या उद्भवलेली आहे. यामुळे लोकांना त्यांच्या फिटनेस बद्दल चिंता वाटू लागली आहे. योग्य आहार नसणे, व्यायामाला वेळ नसणे या गोष्टींमुळे पोटाचे वाढत चाललेले प्रमाण लोकांमध्ये चिंता चे कारण बनलेले आहे. तरीसुद्धा बरेच लोक वेळात वेळ काढून पोट कमी करण्याकरिता जिमला जात असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन पाळत असतात. एवढे करून सुद्धा त्यांना शरीरामध्ये काही बदल झालेला दिसत नाही. खरं तर व्यायामा सोबतच योग्य आहार असणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आहार बदलल्यावरतीच शरीरात पोट चरबीचे प्रमाण वाढायला सुरू होते. आज आपण वजन कमी करण्यासाठी घरगुती सामग्रीचा उपयोग करून कोणती पेय बनवू शकतो ज्याच्यामुळे वजन कमी होऊ शकते यासंदर्भात माहिती घेणार आहोत.
1. कोमट पाणी आणि एप्पल साइडर विनेगर
Weight Loss Tips | एप्पल साइडर विनेगर म्हणजेच सफरचंदाचा विनेगर आज जवळपास खाद्यपदार्थ टिकवून ठेवण्याकरिता सर्व घरामध्ये उपलब्ध असतो. परंतु याचा उपयोग करून नैसर्गिकरित्या तुम्ही तुमचे पचनक्रिया सुरळीत चालू ठेवू शकता. हा विनेगर शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याकरिता मदत करत असतो. विनेगर चे नियमित सेवन केल्यानंतर अभ्यासक्रमातून असे जाणवले आहे की भुकेवर नियंत्रण मिळवण्याकरिता यशस्वी रित्या काम करते. इन्सुलिनचे प्रमाण शरीरात मध्ये सुरळीत राहते. एप्पल साइडर विनेगर सेवन करणाऱ्या व्यक्तींनी एक ग्लास कोमट पाणी घ्यावे आणि त्यामध्ये एक चमचा व्हिनेगर मिसळावा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्यावे.
2. हळद आणि आल्याचा चहा
आले आणि हळद प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमध्ये उपलब्ध असतेच. त्याचप्रमाणे सर्वत्र बाजारामध्ये स्वस्त आणि सहज रित्या मिळते. या दोन्ही सुद्धा आयुर्वेदिक आणि शरीरासाठी गुणकारी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आरोग्याकरिता आले आणि हळद यांचे खूप मोठे फायदे आहेत. आल्या मध्ये जिंजरऑल हा महत्त्वाचा घटक असतो. त्याचप्रमाणे हळदीमध्ये करकमिन हा पण एक महत्त्वाचा घटक असतो. या दोन्हींच्या संयुक्त मिश्रणामुळे शरीरामधील जळजळ कमी होते. त्याचप्रमाणे पचन क्रिया चांगली होते. पचन क्रियेचा वेग सुरळीत चालतो. त्याचप्रमाणे शरीरावर वरील चरबी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. हे पेय तुम्ही तुमच्या किचनमध्ये तयार करू शकता. याकरिता तुम्हाला एक कप गरम पाणी करावे लागेल त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा किसलेले आले टाकावे लागेल. त्यानंतर त्या पाण्याला 10 ते 15 मिनिटे उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर चाळणीने गाळून ते पाणी मध किंवा लिंब मिक्स करून पिऊन टाकावे. यामुळे पचनक्रिया सुधारते शरीरामध्ये उपलब्ध असणारे विषारी घटक शरीरामधून बाहेर टाकले जातात.
3. जिऱ्याचे पाणी
Weight Loss Tips | स्वयंपाक करत असताना प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये पदार्थ बनवण्याकरिता दैनंदिन रित्या जिऱ्याचा उपयोग केला जातो. जिरे सहज उपलब्ध सगळ्यां करिता होते. जिऱ्याचा उपयोग फक्त अन्नपदार्थ बनवण्याकरिता न होता त्याचा महत्त्वाचा उपयोग औषध कामी सुद्धा केला जातो. जिऱ्याचा उपयोग केल्याने पचन क्रिया चांगली सुधारते. पचन क्रिया मंद पडली असेल तर ती पुन्हा सुधारते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये साठून राहिलेले विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम या जिऱ्याचा पाण्याच्या सेवनामुळे सोपे होते. हे पिया तुम्ही घरगुती स्वरूपात सुद्धा बनवू शकता. हे बनवण्याकरिता तुम्हाला एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवावे लागतील. सकाळी उठल्यानंतर हे पाणी उकळून घ्यावे लागेल. उकळून कोमट झालेले पाणी गाळणीने गाळून हे पाणी दररोज तुम्हाला बनवून प्यावे लागेल. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.
Weight Loss Tips | निरोगी आयुष्य जगण्याकरिता महत्त्वाच्या गोष्टी
वजन कमी करणे किंवा वजन संतुलनात ठेवणे हे निरोगी आयुष्य राहण्याकरिता खूप महत्त्वाचे आहे. वरील देण्यात आलेले पेय पिल्यामुळे परिणाम दिसतील असे नाही. परंतु त्याच्यासोबत तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे. त्याचबरोबर योग्य झोप घेणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे, आहारामध्ये ताज्या भाज्या आणि ताज्या फळभाज्या, तंतुमय पदार्थ, फळे यांचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दररोज थोडा थोडा व्यायाम करणे आवश्यक आहे.
दररोज सकाळी उठल्यानंतर वरील पेय पिल्यावर शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी व्हायला सुरुवात होते. वापरण्यात आलेले एप्पल साइडर विनेगर, आली आणि हळद, विनेगर तुमचे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. परंतु वजन कमी करण्याकरिता वेळ जात असतो. त्या वेळेबरोबर वजन कमी करणाऱ्या व्यक्तीने संयम ठेवणे. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न करणे आणि चांगल्या जीवनशैलीचे अनुकरण करणे आवश्यक आहे.