Tesla Car | इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारची भारतात लवकरच एन्ट्री होणार..!

Tesla Car

Tesla Car | जगभरात प्रसिद्ध असणारी इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपन्यांच्या भारतात विक्रीकरिता रूम साठी मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी जागा सुद्धा निवडण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि नवी दिल्ली येथे एरोसिटी शोरूम कंपनीकडून उघडण्याचा प्लॅन सांगण्यात आलेला आहे.

टेस्ला कारचे असणारे फीचर्स लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत त्यामुळे जगभरातील लोक या कारला प्राधान्य देत आहेत. भारतातील लोकांना सुद्धा या कार बद्दल कुतूहल होतेच त्याचप्रमाणे आतुरतेने भारतातील या कारची वाट पाहत होते. परंतु आता भारतातील लोकांचा कुतूहल संपणार आहे. कारण आता टेस्ला कंपनी लवकरच आपल्या गाड्या भारतातील रस्त्यांवर उतरवणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत कंपनीचे सीईओ इलॉन मस्क भारतामध्ये रिटेल व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन करत आहेत. बर्लिनमधील प्लांट कडून इलेक्ट्रिक कार इम्पोर्ट करण्याचा विचार टेस्ला कंपनी सध्या करत आहे.

गाड्यांच्या विक्रीकरिता कंपनीने मुंबई आणि दिल्लीमध्ये शोरूम सुरू करण्यात इंटरेस्ट दाखवलेला आहे. टेस्ला कंपनीने शोरूम करिता दोन्ही शहरांमध्ये जागा सुद्धा निवडलेली आहे. मुंबईतील बीकेसी आणि दिल्ली येथील एरोसिटी मध्ये शोरूम सुरू करण्याचा प्लॅन कंपनीने आखलेला आहे. भारतीय मार्केटमध्ये कंपनीद्वारे 25000 अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतातील सुमारे 22 लाख रुपयांपर्यंत किमतीची इलेक्ट्रिक कार कंपनी लॉन्च करू शकते.

Tesla Car | कार निर्मिती युनिट सुरू करण्यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा नाही

टेस्ला कंपनीद्वारे भारतामध्ये कार निर्मिती करण्याचे प्लांट सुरू करण्याबाबत अजून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. कंपनीला हा प्लांट सुरू करण्याकरिता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. त्याकरिता भारतीय विक्रेत्यांकडून कच्चामाल खरेदी करण्याकरिता कंपनीकडून योजना आपल्या जात आहेत. भारतातील सप्लायर्स कडून जवळपास 8300 कोटी रुपयांचे 2025 पर्यंत टेस्ला कंपनी सोर्सिंग करू शकते. असा कंपनी कडून दावा करण्यात आलेला आहे.

इलॉन मस्क भारतीय दौऱ्यावर येऊ शकतात.

टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोघेजण सुद्धा 2025 च्या शेवटपर्यंत भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता दर्शवली जात आहे. असे अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे. टेस्ला कंपनीने भारतामधील कामगार स्वतःच्या कामाकरिता निवडण्यासाठी जॉब ओपनिंग लिंक या ठिकाणी सुरू केलेली आहे. एकूण 13 जागांसाठी जॉब ओपनिंग पोस्ट करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बैठक झालेली होती. त्यानंतर या घडामोडी घडून आलेले आहेत.

Tesla Car | इलाम मस्क यांच्या संदर्भात माहिती

जगभरातील प्रसिद्ध उद्योजक, उद्योगपती आणि इंजिनियर म्हणून प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व इलॉन मस्क आहे. 28 जून 1971 साली इलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया या ठिकाणी झालेला होता. त्यांनी सुरुवात केलेल्या स्पेसएक्स, टेस्ला आणि पेपाल यांसारख्या कंपनीमुळे मस्क जगभरात प्रसिद्ध झालेले होते. व्यवसायामध्ये त्यांना अत्यंत उच्च यश मिळाल्यामुळे त्यांची कारकीर्द यशस्वी लोकांच्या यादीत येते. इलॉन मस्क यांनी टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. इलॉन मस्क यांच्याद्वारे टेस्ला कारची निर्मिती केलेली होती. आता टेस्ला ही देशांमधील कार निर्माण करणारी सर्वात प्रमुख कंपनी ठरलेली आहे. या कारच्या निर्मितीतून इलॉन मस्क यांनी पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक कारची निर्मिती केली. स्पेसएक्स या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अंतराळ क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवलेली आहे. मंगळ ग्रहावर ती मानवी मिशन्स पोचवणे पर्यंतचे काम इलॉन मस्क यांनी केलेली आहे. त्यांच्या याच कामामुळे त्यांना आधुनिक काळातील थॉमस एडिसन असे सुद्धा म्हटले जाते. पृथ्वीवरती असलेल्या पर्यावरण धोक्याच्या संकटाचे निवारण करण्याचे काम त्यांनी हाती घेतलेले आहे. इलॉन मस्क हे भविष्याचा विचार करणारे धाडसी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.

Tesla Car | टेस्ला कंपनी संदर्भात माहिती

अमेरिकेमधील इलेक्ट्रिक वाहन तयार करणारी कंपनी म्हणजे टेस्ला कंपनी आहे. त्याचप्रमाणे स्वयंचलित वाहन तयार करणारी पहिली कंपनी जगातील आहे. या कंपनीची स्थापना 2003 साली इलॉन मस्क आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी केलेली होती. टेस्ला ही कंपनी इलेक्ट्रिक गाड्या, बॅटरी स्टोरेज, सोलर पॅनल यांसारखे उत्पादन निर्माण करण्यामध्ये अग्रगण्य आहे. पर्यावरणाची काळजी घेणे आणि पर्यावरणाला होणारा धोका कमी करणे हा कंपनीचा मुख्य हेतू आहे. कंपनीने इंधन खर्च कमी करण्याकरिता वाहनांची निर्मिती केलेली आहे.

Leave a Comment