Swargate Pune Rape | स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी मोठी कारवाई होणार.

Swargate Pune Rape

Swargate Pune Rape | पुणे शहर आता बलात्काराच्या घटनेमुळे हादरलेले आहे. एका 26 वर्षे तरुणी वरती सतत रहदारी असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकावर पहाटे बस मध्ये बलात्काराची घटना घडलेली आहे. यानंतर बऱ्याच धक्कादायक गोष्टी आता पोलिसांच्या समोर आलेल्या आहेत. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीडित तरुणी वरती दोनदा लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती धक्कादायक पणे पुढे आलेली आहे.

वैद्यकीय अहवाल पीडित तरुणीचा आता पुढे आलेला आहे. संबंधित तरुणी वरती लैंगिक अत्याचार झाले असल्याचा रिपोर्ट पॉझिटिव आलेला आहे. काल संध्याकाळी ससून रुग्णालयाने पीडितेचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिलेला आहे. या अहवालानुसार पीडित तरुणीवर एकाच आरोपीने दोनदा लैंगिक अत्याचार केलेल्याची माहिती समोर आलेली आहे.

Swargate Pune Rape | त्यादिवशी नेमकं काय घडलेलं ?

पोलीस तपासणी मधून आणि सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे बस स्थानकावर ती प्रवाशांची गर्दी जमलेली होती. त्या तरुणीला फलटणला तिच्या गावी जायचं होते. ती एकटी असल्याचे आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे याने माहिती मिळवली. याच बसस्थानकामध्ये सोलापूर स्वारगेट ही बस रात्री मुक्कामी असल्यामुळे थांबलेली होती. फलटणला जाणाऱ्या बसच्या प्लॅटफॉर्मवर ती तरुणी बसलेली होती फलाट क्रमांक 22 ला फलटण ला जाणारी बस लागत असते. परंतु आरोपीने बस इथे लागत नाही बस मध्यभागी लागलेली आहे. अशी बतावणी करत तिला दुसऱ्या बसमध्ये चढवले. आणि त्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय याने तरुणी वरती अत्याचार केला. पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी या आरोपीने अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे.

बस स्थानकावर प्रवासी महिलांची सुरक्षा रामभरोसे गुन्हा घडल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस जागे झाले आणि त्यानंतर त्यांनी स्वारगेट बस स्थानकावरील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू करायला सुरुवात केली. सदरील आरोपी दत्तात्रेय गाडे हा शिरूर आणि शिक्रापूर भागातील गुन्हेगार असल्याचे लक्षात आलेले आहे. या प्रकरणी त्याच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचप्रमाणे या आरोपी वरती शिरूर आणि शिक्रापूर भागात इतर गुन्हे सुद्धा दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे. अशा प्रकारे जर गुन्हेगार बस स्थानकावर फिरत असतील तर प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे राहिलेली आहे.

Swargate Pune Rape | एकाच वेळी 23 जणांची नोकरी गेली.

Swargate Pune Rape | पुण्यातील एका बसस्थानकामध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. पुण्यामधील स्वारगेट येथील एका बस डेपो मध्ये बलात्काराची घटना घडलेली माहिती समोर आल्यानंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थे संदर्भात प्रश्न निर्माण झालेली आहेत. आता या बलात्कार प्रकरणामुळे एकाच वेळी 23 जणांची नोकरीतून हकलपट्टी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी कारवाई केलेली आहे.

पुण्यातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे स्वारगेट हे आहे. या बसस्थानकावर नेहमीच गर्दी असते. आशा गर्दीच्या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्काराच्या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेट येथे बस स्थानकावर काम करणाऱ्या 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन सुरक्षारक्षक रुजू करण्याचे काम सुद्धा प्रताप सरनाईक यांनी आदेश दिलेले आहेत. परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये जाऊन सदरील घटनेची चौकशी केली. त्याचप्रमाणे त्यांनी घटना ज्या बसमध्ये घडली त्या बस ची पाहणी केली. त्यानुसार शिवशाही बस मध्ये हा सर्व प्रसंग घडलेला होता. यानंतर त्यांनी एसटी कर्मचारी आणि एसटी अधिकारी यांना सूचना दिल्या त्याचप्रमाणे त्यांनी पोलिसांना सुद्धा सूचना दिल्या.

Swargate Pune Rape | पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवर संवाद साधत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. आणि या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला सांगितली. एवढे सगळे होऊन सुद्धा सदरील घटनेतील आरोपी हा फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

Leave a Comment