Sushila Sujit Movie | स्वप्निल जोशी सोबत काम करण्याचा सोनाली कुलकर्णीने सांगितला अनुभव.

Sushila Sujit Movie

Sushila Sujit Movie | ‘सुशीला सुजित’ हा प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकरच सिनेमागृह मध्ये प्रेक्षकांना पाहण्याकरिता प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता स्वतः प्रसाद ओक हा आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे निर्माते प्रसाद ओक सोबतच स्वप्निल जोशी आणि मंजिरी ओक सुद्धा आहेत. या चित्रपटांच्या प्रमुख भूमिके मध्ये स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी आहेत. 18 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीकरिता सिनेमागृह मध्ये येणार आहे. या चित्रपटा निमित्त घेण्यात येणाऱ्या एका मुलाखतीमध्ये सोनाली कुलकर्णी हिने स्वप्निल जोशी सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलेले आहे.

स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही ‘ सुशीला सुजित’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळेस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने स्वप्निल जोशी सोबत काम करण्याचा अनुभव कशा पद्धतीचा होता याबाबत सांगितलेली आहे. स्वप्निल वरती बोलताना सोनाली एसी म्हणाली की ” मी यापूर्वी स्वप्निल ला स्क्रीनवर पाहिलेला आहे. माणसे त्याच्यामागे पुरस्कार सोहळ्यात मागे पुढे पळत असतात. त्यामुळे मला असे वाटले की स्वप्निल आता फक्त कपड्यांबद्दल आणि मेकअप बद्दल बोलेल. परंतु तो फारच कूल आहे. स्वप्निल ला त्याचे डायलॉग म्हणजेच वाक्य येत होते. या सीन पूर्वी कोणता सीन होता हे सुद्धा त्याला माहित होते. नंतर कोणता सीन असणार आहे याबाबत सुद्धा त्याला कल्पना होती. तो पूर्णपणे तयारी करून येणारा नट होता. त्यामुळे पहिल्या दिवशी मला धक्काच बसला. मी स्वप्निल चे खूप कौतुक केले “

Sushila Sujit Movie | यापुढे मुलाखतीमध्ये सोनाली कुलकर्णी अशी म्हणाली की ” मला असे वाटले की मी खूप स्वप्नील सोबत गॉसिप करेन, परंतु माझ्या अपेक्षांचा अपेक्षाभंग केला. घोषित करण्याऐवजी तो फक्त आरशात बघत बसलेला होता. त्याला फक्त त्याचा शूज आणि सॉक्स या गोष्टींचा विचार होता. स्वप्निल हा एक मूर्तिमंत ग्लॅमर आहे. परंतु तो कधी ग्लॅमर राहत नाही. तो खूप नम्र अभिनेता आहे ” असे म्हणत सो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशी यांचे कौतुक केलं.

नवीन आलेला चित्रपट ” सुशीला सुजित ” या चित्रपटाची मोठी चर्चा बाजारात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. चिऊताई चिऊताई दार उघड हे या चित्रपटामध्ये गाणे आहे. काही दिवसांपूर्वी चे गाणे प्रेक्षकांना प्रसारित केलेले होते. या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले दिसत आहे. गश्मीर महाजनी व अमृता खानविलकर हे या गाण्यांमध्ये दिसलेले आहेत. ही जोडी या गाण्यांमध्ये दिसल्यामुळे त्यांची मोठी चर्चा राहिलेली दिसत आहे. ” सुशीला सुजित ” या चित्रपटांमध्ये स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्याप्रमाणेच सुनील तावडे, रेणुका दप्तरदार, सुनील गोडबोले इत्यादी कलाकार सुद्धा वेगवेगळ्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. मुळे आता या चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार आहे. याकरिता प्रेक्षक उत्सुक आहेत.

Sushila Sujit Movie | “सुशीला सुजित” चित्रपटाचा संक्षिप्त आढावा

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि निर्मित “सुशीला सुजित” हा मराठी चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते स्वप्निल जोशी आणि मंजिरी ओक आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिका स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांनी साकारल्या आहेत. त्यांच्या सहकलाकारांमध्ये सुनील तावडे, रेणुका दप्तरदार आणि सुनील गोडबोले यांचा समावेश आहे.

एका मुलाखतीत, सोनाली कुलकर्णी हिने स्वप्निल जोशीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. सुरुवातीला तिला वाटले होते की स्वप्निल फक्त ग्लॅमरकडे लक्ष देणारा अभिनेता असेल, पण प्रत्यक्षात तो अत्यंत मेहनती आणि तयार होऊन येणारा कलाकार आहे, असे तिने सांगितले. तसेच, त्याच्या नम्र स्वभावाचे तिने कौतुक केले.

Sushila Sujit Movie | या चित्रपटातील “चिऊताई चिऊताई दार उघड” हे गाणे विशेष चर्चेत आहे, ज्यामध्ये गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर झळकले आहेत. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. एकूणच, या चित्रपटाच्या कथानकाबाबत फारशी माहिती उपलब्ध नसली तरी स्टारकास्ट आणि संगीत यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment