Stop Sugar For 30 Days | 30 दिवस साखर सोडा तुम्हाला तुमच्या आरोग्यात आश्चर्यकारक बदल दिसतील .

Stop Sugar For 30 Days

Stop Sugar For 30 Days | गोड पदार्थ खाणे आजकाल कोणाला आवडत नाहीत. सर्वजण गोड पदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय काहीजणांना तर जमतच नाही. काही ठिकाणी तर जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याचे पद्धतच रुजू झालेली आहे. पण गोड खाल्ल्यामुळे मानवी शरीराला गंभीर आजार होण्याची आणि वजन वाढण्याची तीव्र शक्यता असते. गोड पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साखर आणि सर्व गोड पदार्थ जर आपण 30 दिवसासाठी सोडले तर आपल्या शरीरात आपल्याला सकारात्मक झालेले बदल जाणवतील. काही पदार्थांमध्ये मिसळलेली साखर आपल्याला समजून सुद्धा येत नाही असे पदार्थ हानिकारक सुद्धा ठरू शकतात. दरवर्षी सरासरी एका व्यक्तीला सेवन करण्यासाठी 28 किलो इतकी साखर लागते असे अमेरिकेतील एका सर्वेक्षणात 2019 साली निरीक्षणात आलेले होते. वर्षाला 28 केजी म्हणजे दिवसाला कमीत कमी 25 ते 30 ग्रॅम साखर प्रत्येक व्यक्तीला खावी लागणार आहे. यामुळे साखरेमुळे होणाऱ्या आजारांचे धोके वाढणार आहेत.

वजन कमी करण्याकरिता बरेच लोक साखर सोडून गूळ आणि मध चालू करतात पण या दोन्हीचा उपयोग फारसा होत नाही. जर वजन कमी करायचे असेल तर सर्वच गोड पदार्थ बंद करावे लागतील. शिवाय पुरुषांपेक्षा कमी साखर महिलांनी खावी. महिलांनी दररोज 100 कॅलरी साखर तर पुरुषांनी 150 कॅलरी साखर खावी.

Stop Sugar For 30 Days | साखर खायचे बंद केल्यानंतर शरीरात काय परिणाम जाणवतात ?

जर तुम्हाला शरीरामध्ये उत्साह वाटत नसेल तर तुम्ही साखर सोडल्यानंतर आणि साखरेचे पदार्थ खाण्याचे टाळल्या नंतर तुम्ही अधिक उत्साही होऊ शकता. साखर खाणे कमी केल्यामुळे शरीरामध्ये कमी कॅलरीज जातात आणि त्यामुळे वजन वाढत नाही किंवा वाढलेले वजन कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला उत्साही आणि फ्रेश वाटते.

आज-काल साखरेचा त्रास म्हणजेच मधुमेहाचा त्रास किंवा शुगर चा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना दिसत आहे. शरीरामधील इन्सुलिनचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळे या आजाराचा उद्भव होतो. जर मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर वजन कमी ठेवणे. त्याचबरोबर साखर कमी प्रमाणात खाणे गरजेचे आहे. साखर खाणे बंद करणे या आजारासाठी खूप महत्त्वाचे आहे.

एक महिनाभर साखर सोडल्यानंतर त्वचेवर सुद्धा चांगल्या प्रमाणात चांगले परिणाम दिसायला सुरुवात होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील सूज साखर सोडल्यानंतर कमी होते. साखर कमी प्रमाणात खाल्ल्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत चालते. काही लोकांना पोट फुगण्याची समस्या असते. साखर सोडल्यामुळे ही समस्या कमी होऊ शकते. आणि त्यापासून आराम मिळू शकतो.

बॉडी ला एनर्जेटिक ठेवण्याकरिता साखर जोडणे खूप गरजेचे आहे. कारण साखर कमी खाल्ल्यामुळे बॉडी उत्साही आणि एनर्जी पूर्ण राहते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि कोणत्याही प्रकारचा आजार होण्याचा धोका कमी होतो.

सतत थकवा जाणवणाऱ्या व्यक्तींना साखर सोडणे फायद्याचे ठरू शकते. साखर सोडल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील थकवा कमी होतो. त्यामुळे साखर सोडणे हे फायद्याचे ठरू शकते.

Stop Sugar For 30 Days | पोटातील बॅक्टेरिया चे प्रमाण सुधारते ?

आपल्या पोटातील आतड्यांमध्ये अन्नाचे विघटन करण्याकरिता चांगले बॅक्टेरिया असतात. त्याचप्रमाणे काही वाईट बॅक्टेरिया म्हणजेच बॅड बॅक्टेरिया सुद्धा असतात. या बॅड बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरामध्ये रोगाचे प्रमाण वाढते. या बॅड बॅक्टेरिया चे प्रमाण वाढवण्याचे काम साखर करत असते. साखर खाल्ल्यामुळे या बॅड बॅक्टेरिया यांना त्यांचे अन्न मिळते. आणि यांचे प्रमाण वाढायला सुरू होते. साखर खाणे बंद केल्यामुळे बॅड बॅक्टेरिया यांचे प्रमाण कमी होते. आणि चांगल्या बॅक्टेरिया चे प्रमाण वाढते. याच कारणांमुळे साखर कमी खाल्ल्यामुळे आजाराचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते. चांगले बॅक्टेरिया शरीरामध्ये वाढल्यामुळे अन्नाचे विघटन आणि पचन चांगल्या स्वरूपात होते. अन्नघटक शरीरामध्ये चांगल्या प्रमाणात मिसळतात. आणि शरीर निरोगी बनते.

साखर बनवण्याकरिता मुळता आर्टिफिशियल केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. मुळे या केमिकल मुळे सुद्धा शरीराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे साखर सोडल्यानंतर शरीरामध्ये होणारे इन्फ्लेशन कमी होते. त्यामुळे जर कोणत्याही ठिकाणी जंतुसंसर्ग होत असेल तर त्याची तीव्रता कमी होते.

Leave a Comment