Shirdi Chennai Express Update | शिर्डी ते चेन्नई रेल्वे प्रवासामध्ये मोठा बदल

Shirdi Chennai Express Update


Shirdi Chennai Express Update | शिर्डी ते चेन्नई रेल्वे प्रवासामध्ये मोठा बदल चेन्नई पासून शिर्डी पर्यंत धावणाऱ्या रेल्वे क्रमांक 22601 आणि 22602 या रेल्वेच्या रचनेमध्ये मोठा बदल झालेला आहे. चेन्नई-शिर्डी- चेन्नई मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला गेलेला आहे. लिंक हॉफमॅन बुश प्रमाणे आता या गाड्या चालवण्यात येणार आहेत. 21 मे 2025 पासून चेन्नई वरून आणि 23 मे 2025 पासून साईनगर शिर्डी पासून हा बदल लागू करण्यात येणार आहे. आरामदायी प्रवास आणि प्रवासामध्ये अधिक सुरक्षितता प्रवाशांना या नवीन रचनेमुळे मिळणार आहे. LBH कोच या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपारिक वापरल्या जाणाऱ्या ICF कोच पेक्षा जास्त मजबूत आणि सुसज्ज असणार आहेत.

नवीन केलेल्या सुधारणे नुसार रचनेमध्ये एकूण 20LBH असणार आहेत. सदरील रेल्वेमध्ये एक एसी-II टियर कोच, 6 एसी – III टियर कोच, 7 स्लीपर क्लास कोच, चार सामान्य द्वितीय श्रेणी कोच, एक सामान्य द्वितीय श्रेणी कोच, एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि त्याचबरोबर जनरेटर व्हॅन चा समावेश असणार आहे.

प्रवाशांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गरजा लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सदरील रचना केलेली आहे. एसी कोच पासून ते सामान्य श्रेणीच्या डब्यात पर्यंत सर्व प्रवाशांकरिता प्रवास करण्यासाठी पर्याय उपलब्ध असणार आहेत. या केलेल्या बदलामुळे आरक्षित जागा मध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. त्यामुळे जे प्रवासी या रेल्वेने प्रवास करणार आहेत अशा प्रवास यांनी बुकिंग करताना नवीन रचना पद्धतीचा अवलंब करून प्रवास करायला सुरुवात करावी.

या सुरू झालेल्या नवीन रेल्वे शिर्डी पासून ते चेन्नई पर्यंत आणि पुन्हा चेन्नई पासून ते शिर्डी पर्यंत असा प्रवास करणार आहे. चेन्नई पासून दर बुधवारी सकाळी 10:25 मिनिटांनी ट्रेन क्रमांक 22601 निघते. आणि शिर्डीला दुसऱ्या दिवशी सकाळी 10:50 पर्यंत पोहोचते.

22602 या क्रमांकाची ट्रेन शिर्डी पासून दर शुक्रवारी सकाळी 08:25 मिनिटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:25 वाजता चेन्नईला पोहोचते. LBH कोच सहित या नवीन गाड्या धावणार आहेत.

या रेल्वेसाठी असणारे नवीन स्टॉप पाहण्यासाठी आणि प्रवाशांना इतर माहिती जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा NTES हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे. आणि त्यातून माहिती मिळवावी.

प्रवाशांना प्रवासामध्ये आराम मिळावा त्यासाठी केलेला हा एक सकारात्मक बदल आहे. कारण LHB कोच मुळे प्रवासामध्ये आराम मिळेल आणि प्रवाशांची संख्या सुद्धा वाढेल. सुरक्षेच्या हिशोबाने सुद्धा चांगला फायदा प्रवाशांना मिळेल. यामुळे कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

Shirdi Chennai Express Update | LBH कोच संदर्भातील अधिक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे.

1. अधिक जागा : LBH कोच ची लांबी अधिक जास्त असते. पारंपारिक कोच ची लांबी कमी असते.

2. सुधारित आसन व्यवस्था : आकर्षक, आरामदायी आणि प्रवासाला अनुकूल असे नवीन डिझाईन आसन व्यवस्था देण्यात आलेली आहे.

3. व्हेंटिलेशन और प्रकाश व्यवस्था : या रेल्वेच्या खिडक्या मोठ्या असल्यामुळे हवा खेळती राहते आणि प्रकाश पूर्णपणे आत मध्ये येतो.

4. सुरक्षितता : या कोच च्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेले मटेरियल अधिक मजबूत असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षित प्राण्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते.

5. आधुनिक तंत्रज्ञान : LBH कोचमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, नियंत्रण दरवाजे, WI FI , बायो टॉयलेट्स यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

Shirdi Chennai Express Update | निष्कर्ष :

सतत नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून रेल्वे प्रशासन रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि आधुनिक बनवण्यासाठी काम करत असते. LBH कोच हे त्याचे एक उत्तम उदाहरण सांगण्यात येईल. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सदरील कोचची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सदरील कोचची निर्मिती रेल्वे द्वारे करण्यात आलेली आहे.यामुळे होणारे मुख्य फायदे म्हणजे प्रवाशांना अधिक आराम या कोच मुळे मिळतो. गाडीच्या वेगाला चालना मिळते आणि प्रवासाचा वेळ कमी होतो. सदरील कोच हा पर्यावरण पूरक डिझाईन मुळे आणि अधिक सुरक्षित असल्यामुळे दीर्घकाळ टिकून राहतो.

Leave a Comment