Shaktipith Highway | शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि प्रशासनाविरोधात आक्रोश

Shaktipith Highway

Shaktipith Highway | प्रशासनाने कोणत्याही प्रकारची शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकन करण्याकरिता कोणत्याही स्वरूपात पूर्वसूचना न दिल्यामुळे शेतकऱ्या मध्ये संतापजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. भोगाव हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावामध्ये जमिनीच्या अधिग्रहण करण्याकरिता शेतकऱ्यांनी शासनाला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता. यावेळेस शेतकऱ्यांनी प्रशासनाची पथके रोखली होती. याचे कारण म्हणजे कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक प्रशासकीय पथके रेखांकन करण्याकरिता आलेली होती यापूर्वी मात्र प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या पूर्वसूचना दिलेला नव्हता यामुळेच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना शेतामध्ये घुसू दिले नाही.

Shaktipith Highway | भूमी अधिग्रहण विरोध

अर्धापूर आणि हदगाव या नांदेड जिल्ह्यातील तालुक्यामधील बागायती जमिनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाकरिता संपादित केल्या जाणार आहेत. या भागामध्ये शेती पूर्णपणे पूर्ण आणि ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यावर आधारित केली जाते. अत्यंत उपजाऊ शेती या भागामध्ये आहे. त्यामुळे कोणीही शेतकरी ही जमीन महामार्गा करिता देण्यास तयार होत नाही. शेतकऱ्यां द्वारे सरकारला या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर घाई गडबड का केली जात आहे याबद्दल सुद्धा विचारले जात आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे जमीन हस्तांतर करताना विश्वासात घेतले जात नाही. यामुळे या गावातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. मोनार्क कंपनीचे असलेले प्रतिनिधी आणि तलाठी यांच्याद्वारे शेतकऱ्यांना खूपच अंतिम टप्प्यामध्ये उपस्थित रहा असे सांगण्यात आलेले आहे. शेतकरी संतप्त होण्याचे कारण म्हणजे असे कोणत्याही शेतकऱ्याला पूर्व सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे काम बंद पाडले.

Shaktipith Highway | शेतकऱ्यांचा तीव्र संताप

शेतकरी सध्या कामामध्ये व्यस्त आहेत यामध्ये प्रामुख्याने हळद आणि गहू काढण्याचे काम सुरू आहे. अशावेळी अचानक आलेल्या फोनवरून या प्रकारच्या सूचना मिळाल्यामुळे शेतकरी गोंधळून गेलेला आहे. शेतकऱ्यांना विश्वास मध्ये घेऊनच प्रकल्प उभा केला जाणार आहे असे सरकारने यापूर्वीच सांगितलेले होते. परंतु असे कोणतेही विश्वास सरकारने शेतकऱ्यावर दाखवलेला नाही उलट त्या बदलात रेखांकन करण्याकरिता अधिकाऱ्यांना शेतामध्ये पाठवले. हे पाहून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी एकत्र येत रोखण्याचे काम केले आणि भूमीचे अधिग्रहण करण्यास स्पष्ट विरोध केला.

अशावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या दबावामुळे अधिकाऱ्यांना रेखांकन थांबवावे लागले आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांचा विरोध एवढा तीव्र होता की त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि रेखांकन याचा निर्णय घ्यावा असे करण्याचे ठरवले.

Shaktipith Highway | शक्तीपीठ महामार्ग विरोधात कृती समिती

भविष्यामध्ये असे प्रकार करण्यापूर्वी पूर्व सूचना देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पूर्वसूचना न देता भूमीचे आग्रह करण्याचे प्रयत्न करणे चुकीचे आहे. अशा प्रकारची सूचना शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता जर अधिग्रहण जबरदस्ती करण्यात आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले जाईल, हा इशारा सुभाष मोरलवार हे कृती समितीचे समन्वयक आहेत त्यांनी हा इशारा दिलेला आहे. त्यांच्याबरोबरच कृती समितीचे इतर लोक उपस्थित होते.

सध्या सुरू असलेला जमिनीच्या रक्षणाकरिता लढा इथून पुढे सुरूच राहणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधात सर्वच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम पडेल कोणतीही पूर्वसूचना न देता सरकारने निर्णय घेऊ नयेत. सरकारने जर अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर या प्रकरणाला मोठे वळण दिले जाऊ शकते.

Leave a Comment