Rinku Rajguru Krishnaraaj Mahadik Photo | भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे यूट्यूबर सुपुत्र कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबत काढलेल्या फोटो मुळे संपूर्ण सोशल मीडिया वरती या फोटोची चर्चा जोरदार चालू आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्यासोबत कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरा बाहेरील फोटो कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती शेअर केलेला होता. त्यामुळे दोघांबद्दल खूपच चर्चा रंगलेल्या होत्या. याबाबत स्वतः कृष्णराज महाडिक यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिलेले आहे.
2025 च्या सुरुवातीला खासदार धनंजय महाडिक यांनी यावर्षी कृष्णराज महाडिक यांचं लग्न करायचा संकल्प घेतलेला आहे. त्यानंतर हा प्रसिद्ध झालेला फोटो यामुळे सोशल मीडिया वरती सर्व नेटकर यांनी या दोघांचे ठरले अशा प्रकारच्या चर्चा रंगवल्या होत्या. त्यामुळे यासंदर्भात बोलण्याकरिता कृष्णराज महाडिक यांनी साम टीव्हीला मुलाखत दिलेली होती. यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ” काल सकाळपासून खोट्या बातम्या काहीजण पसरवत आहेत. सर्वांना त्यांनी विनंती केली की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा अफवा इतरांना पसरवू नये “
त्याचबरोबर कृष्णराज बोलताना असे म्हणाले रिंकू आणि मी मित्र आहोत आणि त्यामुळे मी तिच्यासोबत फोटो काढलेला होता. फोटोमुळे इतर कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही एका कार्यक्रमाकरिता कोल्हापूर शहरामध्ये आलेली होती. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आणि रिंकू भेट झालेली होती. आणि आम्ही दोघेजण महालक्ष्मीच्या दर्शनाकरिता आलेलो होतो असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले आहे. तो फोटो माझ्या सोशल मीडियाच्या टीमने इंस्टाग्राम वरील हँडल वरती पोस्ट केलेला होता. त्यावरून या अफवांना उधाण आलेले आहे. अफवा इतक्या पसरवला गेला की आमच्या दोघांच्याही कुटुंबांना या नात्याबद्दल विचारलं जात आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत यापलीकडे आमच्या नात्यामध्ये काहीच नाही असे कृष्णराजनी सांगितले.
राजर्षी शाहू महोत्सवासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापूर येथे आलेली होती. त्यानंतर ती कृष्णराज महाडिक यांच्यासोबत महालक्ष्मीच्या दर्शनाकरिता मंदिरात गेलेली होती. या दोघांच्या भेटीनंतर काढलेले फोटो सोशल मीडिया वरती पोस्ट करण्यात आले. त्यामुळे या दोघांच्या नात्यावर ती नेटकरांनी जोरदार कमेंट केल्या. दोघांच्या मैत्रीबद्दल अफवा पसरवल्या गेल्या. या अफवा पुढे न पसरवण्याचे आवाहन कृष्णराज यांनी केले आहे.
Rinku Rajguru Krishnaraaj Mahadik Photo | फोटोमध्ये नेमके काय आहे ?
सोशल मीडिया वरती कृष्णराज महाडिक यांच्या टीमने एक फोटो शेअर केलेला होता. या फोटोमध्ये कृष्णराज हे रिंकू राजगुरू सोबत दिसत होते. त्याचप्रमाणे या फोटो पोस्ट करत असताना याला कॅप्शन देण्यात आलेले होते ते असे होते की ” आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले ” असे कॅप्शन कृष्णराज यांच्या टीम कडून देण्यात आलेले होते. त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणि हा काही वेळातच व्हायरल झाला. समाजातील विविध लोकांनी या फोटोंवर कमेंट्स करायला सुरुवात केली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा कृष्णराज आणि रिंकू यांच्याबाबत समाज माध्यमावर पसरू लागल्या. या चर्चा इतक्या वाढल्या की कृष्णराज यांना थेट पुढे येऊन योग्य स्पष्टीकरण द्यावे लागले.
Rinku Rajguru Krishnaraaj Mahadik Photo | रिंकू आणि मी चांगले मित्र आहोत.
कृष्णराज महाडिक यांनी स्पष्टीकरण देतात असे सांगितले की अभिनेत्री रिंकू राजगुरू माझी चांगली फक्त मैत्रीण आहे. आमच्या दोघांमध्ये दुसरे काहीही नाते नाही आहे. मी पोस्ट केलेल्या फोटोमुळे कोणीही इतर कोणताही गैरसमज करून घेऊ नये. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू आल्या होत्या त्या दरम्यानच आमची भेट झालेली होती. दर्शना वरून आल्यानंतर मंदिराबाहेर काढलेल्या फोटोंना टीम कडून सोशल मीडिया वरती पोस्ट करण्यात आले. आणि सगळीकडे चर्चेला उधाण आले. आम्ही दोघेजण प्री प्लॅनिंग करून एकमेकांना भेटलो होतो. पण या भेटीचा दुसराच अर्थ काढला जात आहे. आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. यापलीकडे आमच्यात काहीच नाही.