Raigad Rope Way | रायगडावरती जाण्याकरिता रोप वे ची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधा मुळेच दिव्यांग व्यक्ती, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती यांना रायगडावरती जलद रित्या रोप वे माध्यमांतून पोचवले जात आहे. रोपे मुळे कमी वेळेमध्ये रायगडावरती जाणे शक्य झालेले आहे. यामुळे वेळ मोठ्या प्रमाणात वाचत आहे. परंतु रोप वे काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे रोप वे सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.
रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी होती. रायगडावरती जाण्यासाठी हिरकणी वाडी या ठिकाणी रोप वे सुविधा उपलब्ध आहे. या रोपे वे द्वारे रायगड पर्यटनासाठी आलेल्या वयोवृद्ध आणि शाळकरी मुलांना रायगडावरती जाणे सहज शक्य झाले होते. परंतु दिनांक तीन मार्च ते 7 मार्च पर्यंत तांत्रिक देखभाल करण्याकरिता रायगड वरील रोपे बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये आलेल्या पर्यटकांना रायगड रोपवे चा वापर करता येणार नाही. येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय झाली नाही पाहिजे यामुळे रोप वे चे इन्चार्ज असलेले राजेंद्र खातू यांनी हे स्पष्टीकरण दिलेले आहे.
Raigad Rope Way | रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला किल्ला आहे. हा किल्ला पाहण्याकरिता देशातून आणि विदेशातून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध शाळेमधील, महाविद्यालयातील हजारो पर्यटक दररोज रायगडाला भेट देत असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संदर्भातील माहिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी त्यांच्या पराक्रमाचे ऐतिहासिक पुरावे अभ्यास करण्याकरिता येणाऱ्या सर्वांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी. या पर्यटकांना पायऱ्या द्वारे रायगडावरती जायचे आहे असे पर्यटक पायऱ्या द्वारे जाऊ शकतात. परंतु ज्यांना पायऱ्या द्वारे जाणे शक्य नाही आशा करिता रोप वे बनवण्यात आलेला आहे. ज्यांना शक्य नाही ते बरेच जण रोप वे द्वारे रायगडावर जात असतात. वृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले यांना सुद्धा रायगडावर पोहोचणे शक्य झालेले आहे. बहुपयोगी असा रोप वे तांत्रिक अडचणींमुळे रोपवे बंद राहणार आहे.
हिरकणी वाडी हे गाव रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये रोप वे सुविधा उपलब्ध आहे. रायगडावरती जाण्याकरिता सुरुवातीला हिरकणी वाडी या ठिकाणी यावे लागते. शासकीय अधिकारी, राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे मंत्री, आमदार, खासदार आणि इतर लाखो लोक रायगड किल्ल्यावर ती येत जात असतात. कै. विष्णू महेश्वर जोग यांनी 1996 साली रायगडावरती जाण्याकरिता रोप वे स्थापना केलेली आहे. त्यांच्या याच कारणामुळे वृद्ध व अपंग असलेल्या किंवा शारीरिक दृष्ट्या गड चढण्या करिता सक्षम नसणाऱ्या व्यक्तींना गडावर जाणे शक्य झाले आहे.
3 मार्च 2025 ते 7 मार्च 2025 या तारखेच्या दरम्यान रोप वे चा मेंटेनन्स असल्यामुळे त्याची तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती काम सुरू असणार आहे. त्यामुळे या कालावधीत चार दिवसाकरीता रोपवे बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आधीच सूचना सर्व शिवभक्तांना देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कोणीही रोप वे च्या द्वारे गडावर जाऊ शकणार नाही.
Raigad Rope Way | निष्कर्ष
पर्यटकांना रायगड किल्ल्यावरती जाण्याकरिता रोप वे उपयुक्त आहे. परंतु या रोप वे च्या तांत्रिक कामकाजामुळे हा रोप वे दिनांक 3 मार्च 2025 ते 7 मार्च 2025 या तारखे दरम्यान तांत्रिक कामानिमित्त बंद राहणार आहे. या दरम्यान रोखण्याच्या सेवेचा शिवभक्तांना लाभ घेण्यात येणार नाही. त्यामुळे या तारखे दरम्यान पर्यटकांना सांगण्यात येते की गडावरती रोप वे द्वारे जाण्या ऐवजी इतर पर्यायी मार्गाने जाण्याचा विचार करावा. रायगडावरती दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे दररोज मोठ्या संख्येत शिवभक्त सुद्धा येत असतात. रायगड हा एक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. ऐतिहासिक अभ्यासाकरिता दरवर्षी या ठिकाणी लाखो इतिहासकार मोठ्या उत्साहाने येत असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता या सूचना देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या पर्यटकांनी रोप वे बंद असणारी दिनांक पाहूनच पुढील योजना आखावी. ज्यामुळे त्यांच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत.