Pune Railway News | उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी पुण्यावरून नवीन ट्रेन सुरू होणार.

Pune Railway News

Pune Railway News | आत्ता अतिशय आनंदाची बातमी पुणे करांसाठी समोर येत आहे. या बातमीनुसार रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढलेली दिसत आहे. या कारणामुळेच रेल्वेद्वारे विशेष मार्ग पुणे ते गाजीपुर या रूट ला नवीन रेल्वे सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

पुण्यामधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता ही एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकावरून पुणे शहरापासून एक नवीन ट्रेन विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे. द्वी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन पुणे ते गाजीपुर या स्टेशनच्या दरम्यान रेल्वेत चालवली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन अहिल्या नगर वरून जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टी ने प्रवाशांची संख्या अधिकच वाढवलेली आहे. वेगवेगळ्या रेल्वे मार्गावरती उन्हाळ्या सुट्टी स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे जास्त होणारी गर्दी नियंत्रणात ठेवली जात आहे.

नव्याने सुरू होणाऱ्या पुणे ते गाजीपुर शहराची चालणारी द्वि साप्ताहिक विशेष गाडी संदर्भात पूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. प्रसिद्ध झालेले वेळापत्रक आपण जाणून घेणार आहोत.

Pune Railway News | पुण्याहून धावणाऱ्या नवीन द्वि साप्ताहिक ट्रेनचे वेळापत्रक कसे चालणार आहे ?

गाडी क्रमांक 01431 ही गाडी रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे पुणे ते गाजीपुर शहर आठवड्यातून दोन दिवस सुरू राहणार आहे. 8 एप्रिल 2025 ते 27 जून 2025 या कालावधीदरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टी करिता ची नवीन गाडी सुरु करण्यात आलेली आहे. शुक्रवारी आणि मंगळवारी सकाळी 6:40 वाजता ही ट्रेन पुण्या करिता निघणार आहे. 20:15 वाजता दुसऱ्या दिवशी रात्री गाजीपुर शहरामध्ये ही ट्रेन पोहोचणार आहे. एकूण 24 फेऱ्या या विशेष ट्रेनच्या होणार आहेत. यानुसार प्रवाशांनी आपले तिकीट अगोदरच बुक करून या सेवेचा लाभ घ्यावा.

त्याचप्रमाणे गाजीपुर वरून पुण्याला जाणाऱ्या गाडीचा क्रमांक 01432 असणार आहे. ही गाडी प्रामुख्याने 10 एप्रिल 2025 ते 29 जून 2025 या तारखेच्या दरम्यान सुरु राहणार आहे. रविवारी आणि गुरुवारी या काळामध्ये ही गाडी गाजीपुर रेल्वे स्थानकावरून निघणार आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी वेळेनुसार अनेक गरजेनुसार तिकीट बुकिंग करावे.

Pune Railway News | पुणे- गाजीपुर ट्रेन कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?

एक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरती या रेल्वेला थांबा मंजूर केलेला आहे. पुणे ते गाजीपुर दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेने मंजूर झालेल्या थांबा वरती थांबणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर रेल्वे स्थानकाचा समावेश केला गेलेला आहे. खाली दिलेल्या स्थानकांवर ती ही रेल्वे थांबली जाणार आहे.

दौंड, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटणी, मेहर, सटाणा, माणिकपूर, प्रयागराज, वाराणसी, जौनपुर, औंरीहार या स्थानकांवर ती प्रामुख्याने ही नवीन सुरू झालेली ट्रेन थांबली जाणार आहे.

गाजीपुर- पुणे ही ट्रेन कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे ?

गाजीपुर पासून निघालेली रेल्वे पुण्याला जाताना मंजूर झालेल्या स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये प्रामुख्याने औंरीहार, जौनपुर, वाराणसी, प्रयागराज, माणिकपुर, सटाणा, मेहर, कटनी, मदन महाल, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहिल्यानगर, दौंड चोर केबिन या ठिकाणी सदरील ट्रेन थांबणार आहे.

Pune Railway News | निष्कर्ष

पुणे ते गाजीपुर दरम्यान नवीन द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्रेन 8 एप्रिल 2025 ते 29 जून 2025 या कालावधीत चालणार असून, पुण्याहून मंगळवारी आणि शुक्रवारी निघेल, तर गाजीपुरहून गुरुवारी आणि रविवारी सुटेल. प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा. दौंड, मनमाड, जळगाव, वाराणसी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर गाडी थांबेल. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल.

Leave a Comment