Protein Powder Reality | प्रोटीन पावडर घेणे खरच गरजेचे आहे का ? जेवणातून प्रोटीन मिळू शकते का ?

Protein Powder Reality

Protein Powder Reality | प्रोटीन हा शरीरातील एक महत्त्वाचा घटक आहे. सर्वांच्या शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला शरीरामध्ये ताकद वाढवण्याकरिता किंवा मसल वाढवण्याकरिता प्रोटीन सेवन करण्याचा सल्ला देण्यात येत असतो.

खरंच प्रोटीन खाल्ल्यामुळे शरीराला ताकद मिळते का ? त्याचप्रमाणे प्रोटीन मिळवण्याकरिता कोणते अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत ? हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

आज काल आपण फास्ट फूड खूप मोठ्या प्रमाणात खात आहे. त्याचप्रमाणे चवीसाठी आणि मन भरून खाण्याकरिता आपण काय खातो याच्याकडे पाहत नाही. त्यामुळे वजन वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वजन जास्त वाढल्यामुळे लोक नकारात्मक होत चाललेले आहेत.

सर्वच व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकरिता त्याचप्रमाणे शारीरिक आरोग्याकरिता वजन नियंत्रणात असणे खूप गरजेचे आहे. वजन कमी करण्याकरिता हल्ली सर्वच लोक जिम ला जात असतात. सुरुवातीच्या काळात जिमला जाण्याचा उद्देश फक्त वजन करणे हा असतो. नंतर त्यांना हळूहळू मसल वाढवण्या मध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. मसल वाढवण्याकरिता योग्य पोषण शरीराला मिळणे खूप गरजेचे असते. त्या पोषणा मध्ये प्रोटीन घटक असणे गरजेचे आहे. मांसाहारी लोकांच्या आहारामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. परंतु जे लोक शाकाहारी आहेत त्यांना तेवढ्या प्रमाणात प्रोटीन मिळवणे अशक्य असते. त्यामुळे ते पुढे जाऊन प्रोटीन पावडर चे सेवन करायला सुरुवात करतात. प्रत्येक वेळी प्रोटीन युक्त आहार घेणे सोपे नसते त्यामुळे प्रोटीन पावडर च्या उपयोगामुळे लगेचच प्रोटीनचे प्रमाण शरीरामध्ये वाढते.

Protein Powder Reality | शरीरामध्ये प्रोटीन ची गरज किती आहे ?

तज्ञांच्या सांगण्यानुसार माणसाच्या शरीरामध्ये विविध प्रकारचे काम करण्याकरिता प्रोटीन ची आवश्यकता असते. प्रोटीन अण्णा मधून शरीरामध्ये मिसळण्या पूर्वी त्याचे अमिनो ऍसिड मध्ये विघटन होते. मानवी शरीरामध्ये एकूण 20,000 पेक्षा जास्त प्रोटीन असतात. हे प्रोटीन हिमोग्लोबिन, एन्झाइम्स, स्नायू, त्वचा, केस यांचे कार्य पार पाडण्याकरिता मदत करत असते.

व्यक्तीच्या वयानुसार , वजनानुसार, जीवनशैलीनुसार , व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे यानुसार त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण किती गरजेचे आहे हे ठरवले जाते. व्यक्तीच्या वजनाच्या 0.8 ग्रॅम एवढे प्रोटीन त्या व्यक्तीने सेवन करणे आवश्यक आहे. अमेरिकेत राहणारे लोक त्यांच्या शरीराला लागणारे आवश्यक प्रोटीन बहुतांश त्यांच्या आहारा मधूनच घेतात. जर तुम्ही कोणताही खेळ खेळत असाल केव्हा जास्त प्रमाणात व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरात करिता प्रोटीनचे प्रमाण किलोग्राम करिता 1g प्रोटीन असू शकते.

व्यक्तीच्या वयानुसार सुद्धा त्याच्या शरीरातील आवश्यक प्रोटीनचे प्रमाण ठरवण्यात येते. वयानुसार व्यक्तींच्या शरीरामधील मसल चे प्रमाण कमी-जास्त होत असते. प्रोटीन अधिक प्रमाणात खाल्ल्यानंतर आपण शरीरामध्ये वसंतचे प्रमाण टिकवून ठेवू शकतो.

Protein Powder Reality | प्रोटीनचे प्रमाण गरजेनुसार वेगवेगळ्या असते.

सतत प्रॅक्टिस करणारे खेळाडू, वजन उचलणारे वेटलिफ्टर, बॉडी बिल्डर यांच्या शरीरयष्टी करिता शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण दररोज आवश्यक 1 केजी करिता 1.6 – 2.2 gm इतक्या प्रमाणावर असणे आवश्यक आहे. तज्ञांच्या सल्ल्यानुसार सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन त्याच्या दैनंदिन भोजना मधून सुद्धा मिळवणे शक्य आहे.

शाकाहारी व्यक्तींकरिता प्रोटीन युक्त आहार म्हणजे दही, दूध, अंडी, पनीर, चीज, सोयाबीन या घटकांचा आहारामध्ये समावेश करून शाकाहारी व्यक्ती प्रोटीन ची पूर्तता पूर्ण करू शकतात.

Protein Powder Reality | प्रोटीन पावडर पासून कोणती समस्या निर्माण होते ?

प्रोटीन पावडर चा उपयोग करणाऱ्या परंतु व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हर चे नुकसान होऊ शकते. व्हे प्रोटीन चा उपयोग केला तर व्यक्तींना पचना संदर्भात समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे यकृताला विष प्रभाव होऊ शकतो.

प्रोटीन पावडर आज-काल मार्केटमध्ये बनावट किंवा नकली स्वरूपाच्या येत आहेत. त्यामुळे या प्रोटीन पावडर मध्ये दूषित घटक आसण्याची तीव्र शक्यता आहे. बऱ्याचशा कंपनीचे प्रोटीन पावडर एक मेडिकल टेस्टेड केव्हा लॅब टेस्टेड नसतात. त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते. प्रोटीन पावडर मध्ये संशोधकांच्या म्हणण्यानुसार 130 प्रकारचे विषारी द्रव्य असतात.

Leave a Comment