Petrol Price | जगामध्ये काही देशांमध्ये पेट्रोल खूपच स्वस्त असल्याचे दिसून येते. तर काही देशांमध्ये पेट्रोलचे भाव खूपच जास्त वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये खूपच मोठा फरक आपल्याला दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारत देशामध्ये तेल कंपन्यांच्या द्वारे ठरवल्या जातात. आणि त्यामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कराला आकारले जाते. या किमतीमध्ये कराचा मोठा वाटा असतो. याच कारणांमुळे देशांमधील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वेगवेगळ्या असतात.
पोर्ट ब्लेयर हे अंदमान आणि निकोबार चे राजधानी असलेले शहर भारतामध्ये सर्वात जास्त स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळणारे शहर आहे. या ठिकाणी 82.46 रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आहे. पोर्ट ब्लेअर नंतर इटानगर या ठिकाणी 90.87 रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आहे. 92.37 रुपये प्रति लिटर एवढी पेट्रोलची किंमत सिल्वासा या ठिकाणी आहे. दमन येथे पेट्रोलची किंमत 92.55 रुपये प्रति लिटर एवढी आहे. या शहरांमध्ये भारतातील इतर शहरांपेक्षा कमी कर आकारला जातो. यामुळे या ठिकाणी पेट्रोलच्या किमती कमी असतात.
अंदमान आणि निकोबार ची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर या शहरांमध्ये डिझेलची किंमत 78.05 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील सर्वात कमी किमतीचे डिझाईन या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर इटानगर या ठिकाणी 80.34 रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत आहे. 81.32 रुपये प्रति लिटर जम्मू येथे डिझेलची किंमत आहे. सांबा या ठिकाणी 81.58 रुपये प्रति लिटर डिझेल मिळत आहे. स्थानिक कर रचनेमुळे इंधनाच्या दरामध्ये जाणवलेला दिसत आहे.
इराण, लिबिया आणि व्हेनेझुएला या ठिकाणी जगामधील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत आहे. इराण देशामध्ये पेट्रोलचे दर फक्त 2.49 रुपये प्रति लिटर एवढे आहे. लिबिया या देशांमध्ये पेट्रोलचा दर 2.67 रुपये प्रति लिटर एवढा आहे. व्हेनेझुएला मध्ये पेट्रोलचा दर 3.05 रुपये प्रति लिटर देण्यात आलेला आहे. या देशांमध्ये पेट्रोलचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे या देशात सरकारच्या अनुदानामुळे नागरिकांना खूप कमी भावामध्ये पेट्रोल उपलब्ध करून दिले जाते.
दुसऱ्या बाजूला पाहिले तर सर्वात महाग पेट्रोल विकणारा देश हा हॉंगकॉंग आहे. या ठिकाणी पेट्रोलची किंमत 298.94 रुपये प्रति लिटर इतकी आहे. आइसलँड या देशामध्ये पेट्रोलची किंमत 199.57 रुपये प्रति लिटर देण्यात आलेली आहे. डेन्मार्कमध्ये 183.32 रुपये प्रति लिटर पेट्रोल आहे. नेदरलँड देशामध्ये 181.32 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने आयात केलेले तेल वापरले जाते आणि देशामध्ये कर जास्त आकारल्या या देशांमध्ये पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेल्या दिसत आहे. ब्रेंट क्रूड ची किंमत 70.11 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेल वरती आहे. 66.76 अमेरिकन डॉलर प्रती बॅरल एवढी किंमत WTI क्रूड ची आहे. पेट्रोलच्या किमती ठरवण्याकरता जागतिक मागणी आणि पुरवठा, ओपीके देशांचे उत्पादक धोरण, जागतिक राजकीय घडामोडी या सर्व घटकांवर ती पेट्रोलची किंमत ठरते.
Petrol Price | भारतामध्ये असलेल्या इंधनाच्या दारावरती करांची मोठी भूमिका ठरत असल्याचे समोर आलेले आहे. उत्पादन शुल्क केंद्र सरकारकडून आकारला जातो. तर इंधनाच्या किमती राज्य सरकारकडून ठरवले जातात. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये किमती वेगवेगळ्या असतात. रुपयाच्या तुलनेमध्ये होणारे डॉलरमधील बदल त्याचप्रमाणे जागतिक बाजारामधील बदल, वाहतुकीचा खर्च आणि विनिमय दर हे इंधनाचे दर ठरवण्याचे मुख्य घटक आहेत.
Petrol Price | पेट्रोलच्या दरामध्ये मोठी तफावत जी आढळत आहे. त्या तफा मागे आंतरराष्ट्रीय कारणे आणि विविध स्थानिक कारणे आहेत. काही देशांत सरकारी अनुदान असल्यामुळे पेट्रोलचे दर स्वस्त आहेत. तर काही ठिकाणी जास्त कर असल्यामुळे इंधनाची किंमत वाढलेली जात आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीवर भारतामधील इंधनाचे दर अवलंबून असतात. त्यामुळे स्थानिक कर रचना पेट्रोलच्या किमती मध्ये बदल घडवून आणत असते. यामुळे घराचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याचे दिसत आहे.