New Express Way Maharashtra | महामार्ग प्रकल्पाची आणखीन एक नवीन भेट महाराष्ट्राला मिळणार आहे. 29 केएम लांबीचा एक नवीन नवी मुंबईमध्ये सहा पदरी महामार्ग तयार केला जाणार आहे. मुंबई ते पुणे आणि मुंबई ते गोवा हा प्रवास या नव्या महामार्गामुळे वेगाने होणार आहे.
मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई मधील मोठमोठे रस्ते आणि विकासाच्या प्रकल्पाची कामे पूर्ण केली गेलेली आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आणि वेगवान प्रवास सुरू राहण्यासाठी केंद्र सरकार द्वारा नवीन महामार्ग विकासाकरिता सुरू करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. या प्रकल्पाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे.
पागोटे ते चौक दरम्यान या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण परिसरात असणाऱ्या ठिकाणी हा पदरी मार्ग तयार केला जाणार आहे. नवीन केला जाणारा हा एक्सप्रेस वे 29 किलोमीटर लांबीचा असणार आहे.
4500 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे जुन्या महामार्ग सह कर्जत या ठिकाणी हा नव्याने विकसित होणारा 30 केएम लांबीचा मार्ग जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे नव्याने विकसित होणारे मुंबई-पुणे एक्सप्रेस आणि महाराष्ट्र आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग यामधील वाहतूक जलद गतीने होणार आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर वाहतूक सुलभ आणि सरळ होणार आहे. असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याद्वारे करण्यात आलेला आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामधील वाहतूक सुद्धा तयार होणाऱ्या नवीन एक्सप्रेस वे च्या मदतीने अगदी जलद गतीने होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. बीओटी तत्त्वावर म्हणजेच बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर या तत्त्वावर सदरील महामार्ग विकसित केला जाणार आहे. बीओटी तत्त्वावर उभारले जाणारे हे आधुनिक मॉडेल असणार आहे. ज्यामध्ये हा महामार्ग बांधण्याचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्या महामार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा त्यात खाजगी कंपन्यांकडे असणार आहे. करार पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या वर्षानंतर तो महामार्ग कंपनीला सरकारकडे हस्तांतरित करावा लागणार आहे.
सध्या रस्त्यावर प्रचंड वर्दळ दिसत आहे. खास करून जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे यांच्यामधील रस्त्यांवर प्रचंड गर्दी आणि ट्राफिक दिसते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. डी पॉईंट, पळसपे फाटा, कळंबोली जंक्शन, पनवेल या ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनांची खूपच गर्दी असते त्यामुळे प्रवाशांना तीन तासापेक्षा अधिक काळ सुद्धा उशीर होऊ शकतो.
New Express Way Maharashtra | या एक्सप्रेसवे वरून दररोज बघायला गेलं तर दीड लाखाहून अधिक जास्त वाहने यामाहा मार्गावरून वाहताना दिसतात. नवीन एक्सप्रेस वे सुरू झाल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्याकरिता मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे हा महामार्ग बनवण्याकरिता दोन बोगदे तयार करावे लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री पर्वता खाली हे दोन बोगदे तयार करावी लागणार आहे. त्यामुळे घाट मार्गावरून होणारा वळणाचा प्रवास कमी होणार आहे.
अपघातांचे प्रमाण या नवीन महामार्गामुळे कमी होणार असल्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. मुंबईहून गोव्याला जाणे हा नवीन महामार्ग सुरू झाल्यानंतर सोयीचे राहणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई ते पुणे होणारा प्रवास जलद गतीने आणि सोयीस्कर होणार आहे. तसं पाहायला गेलं तर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण या ठिकाणावर दररोज मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनरची वाहतूक केली जाते. कारण हे एक महत्त्वाचे बंदर आहे. त्याचप्रमाणे या नवीन होणाऱ्या महामार्गावरची वाहतूक नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणूनच हा नवीन 30 केएम मार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मालवाहतूक अगदी जलद आणि प्रभावी पद्धतीने करण्याकरिता या नवीन एक्सप्रेस वे चा उपयोग केला जाणार आहे. त्याचप्रमाणे व्यापार अधिक वेगाने सुरू होणार आहे.
New Express Way Maharashtra | राज्याचा आणि देशाचा विकास होण्याकरिता या नवीन महामार्गाचा मोठा हात असणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुंबई आणि पुण्यामध्ये व्यावसायिकांसाठी हा नवा मार्ग फायदेशीर ठरणार आहे. यामुळे सर्वत्र व्यावसायिक आणि औद्योगिक प्रगती होणार आहे. अशा प्रकारचा विश्वास तज्ञ व्यक्तीकडून द्वारे दाखवला गेलेला आहे.
New Express Way Maharashtra | प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव या नवीन महामार्गावर मिळणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना त्यांच्या मालवाहतुकीसाठी सोपा आणि सोयीस्कर पर्यायाने महामार्गामुळे उपलब्ध होणार आहे.