Money Lender License | खाजगी सावकारकी चा परवाना फक्त 500 रुपयात मिळतो.

Money Lender License

Money Lender License | फक्त काही कागदपत्रांच्या आधारे आणि ₹500 मध्ये खाजगी सावकारकी चा अधिकृत परवाना सहजपणे मिळत आहे. त्यामुळेच बाजारामध्ये सावकारांची संख्या अधिक वाढलेली आहे. परंतु यामध्ये अधिकृत सावकारांची संख्या कमी असून विना परवाना सावकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्या व्यक्तींना पैशाची गरज आहे अशा व्यक्तींना सहजपणे पैसे पुरवण्याचे काम हे सावकार करत असतात. परंतु त्याचे व्याज खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि असे मोठ्या प्रमाणातील व्याज आकारून सावकारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते.

Money Lender License | जास्त व्याजदर समस्या

कमी कालावधी करिता देण्यात आलेल्या कर्जा वरती मोठ्या प्रमाणामध्ये व्याज आकारले जाते. हे व्याज खूपच मोठ्या प्रमाणात असते. अनेक लोक हे व्याज भरू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मुद्दल ही सावकाराला वेळेवर वापस देऊ शकत नाहीत. त्यामुळे बरेच लोकांवरती कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. या सावकारांच्या त्रासाला कंटाळून काही प्रकरणांमध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला त्रास सहन झालेला नाही आणि त्या व्यक्तीने आत्महत्या केली असे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे सावकार की आणि त्या व्यवसायावर सरकारने वेळोवेळी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

सावकारकी चा चुकीचा उपयोग

सावकारकी चा परवाना असल्यामुळे सावकार संबंधित कर्ज दिलेल्या व्यक्ती वरती मोठ्या प्रमाणात सक्तीने वसुली करत आहेत. ही वसुली बेकायदेशीर रित्या चालू आहे. कर्जाची वसुली करण्याकरिता या सावकारा द्वारे व्यक्तीला दमदाटी करणे, गुंडांच्या साहाय्याने मारहाण करणे अशा प्रकारचे प्रसंग दिसून येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आपण पाहिलेले असतील. परंतु ओपन निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही.

सावकारीच्या लायसन वापरून गोरख धंदा

ज्या सावकारांकडे सावकारकी करण्याचे लायसन आहे आशा सावकारांकडून जास्त व्याजदर आकारले जाते. अशा वेळेस कर्ज घेणारा व्यक्ती स्वतःची मालमत्ता जसे की घर, जमीन, सोने इत्यादी गोष्टी तारण ठेवून पैसे घेतात आणि बऱ्याचदा कर्ज फेडण्याच्या अयशस्वी झाल्यानंतर त्यांना तारण ठेवलेली संपत्ती गमवावी लागते. यामुळे सावकार त्यांच्या मालमत्तेवर ती बेकायदेशीर ताबा मारतो. मोठ्या प्रमाणामध्ये सावकार की फोफावली असल्यामुळे बरेच सावकार परवाना नसताना सुद्धा अशी बेकायदेशीर कृत्य करत आहेत. घेतलेल्या रकमेवर वरती दररोज 5% किंवा 10 ते 15 टक्के असे दररोज व्याज काही ठिकाणी आकारले जाते. बऱ्याच वेळेस लोकांना तातडीने पैसे उभे करण्याची आवश्यकता असते. अशा वेळेस बँक आणि इतर ठिकाणावरून पैसे नाही मिळाल्यास त्यांना नाईलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. अशा वेळेस मात्र पैसे घेताना कोणतेही करार केले जात नाहीत. त्याचप्रमाणे सावकारांकडून जर त्रास दिला जात असेल तर लोक तक्रार करण्यासाठी सुद्धा पुढे येत नाहीत. गंभीर परिस्थिती दिसून आल्यानंतरच केव्हा गंभीर परिणामांना समोर गेल्यानंतरच लोक तक्रार करण्यासाठी पुढे येतात.

Money Lender License | अहिल्यानगर जिल्ह्यातील सावकारकी

134 अधिकृत परवाना असलेले सावकार अहिल्या नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु या सावकारा द्वारे जास्त व्याजदर वसूल जात असल्यामुळे कर्ज घेतलेल्या व्यक्ती अडचणीत आलेले आहेत. त्यामुळेच कठोर कारवाई अशा सावकारांवर झालेली असणे आवश्यक आहे.

व्याजदराचे नियम परवाना धारक सावकारा साठी

शासनाद्वारे दिलेला व्याजदर न पाळल्यामुळे परवाना धारक सावकारा विरोधात सुद्धा तक्रार करता येऊ शकते. खाजगी सावकार की मधून पिळवणूक केल्यास त्या सावकारावर ती कारवाई केली जाऊ शकते. या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सावकारांकडून कर्जदारांची पिळवणूक केली जात आहे.

Money Lender License | परवाना मिळवण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

सावकारी परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते, विज बिल यांसारखी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कागदपत्रे आणि शुल्क भरल्यानंतर हा परवाना दिला जातो. सावकारकी चा अधिकृत परवाना प्रस्ताव मिळाल्यानंतर तपासणी करून झाल्यानंतर मंजूर केला जातो.

Leave a Comment