LIC Retirement Plan | भारतामधील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमन ही आहे. ही माहिती देशातील सर्व नागरिकांना माहीतच आहे. आपण सर्वजण याला एलआयसी म्हणून सुद्धा ओळखतो. देशातील नागरिकांना आता एलआयसी कडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. म्हणजेच पेन्शन मिळण्याकरिता एलआयसी कडून स्मार्ट पेन्शन प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे. या नवीन प्लॅन नुसार ग्राहकांना एकदा गुंतवणूक केल्यानंतर त्या प्लॅन चा फायदा आयुष्यभर मिळणार आहे. या लेखामध्ये आपण नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन काय आहे हे समजून घेणार आहोत.
देशातील सर्वात खात्रीदायक आणि मोठी असणारी इन्शुरन्स कंपनी म्हणून एलआयसीला आपण ओळखत आहोत. एक नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन याच एलआयसी कडून सध्या लॉन्च करण्यात आलेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरावा लागणार आहे. या पेन्शन प्लॅन ला इमिजेट एनु टी प्लॅन असेसुद्धा म्हटले आहे. या प्लॅन चा लाभ तुम्हाला वैयक्तिक किंवा संयुक्त रित्या घेण्यात येणार आहे. एलआयसी चे सीईओ नागराजे यांच्याकडून हा प्लॅन लॉन्च केला गेलेला आहे.
LIC Retirement Plan | या प्लॅन विषयी महत्त्वाचा अपडेट खालील प्रमाणे.
भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे करिता एक नवीन मार्ग म्हणून हा प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे. या प्लेन नुसार तुम्ही एलआयसी मध्ये एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता. यामध्ये तुम्ही एकटे किंवा अधिक व्यक्ती सुद्धा गुंतवणूक करून या प्लॅन चा उपयोग घेऊ शकता. या प्लॅन साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 100 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना तुम्ही सुरुवातीला 1 लाख रुपये रकमेपासून गुंतवणूक करू शकता. याचा फायदा तुम्हाला चांगला मिळेल.
या प्लॅननुसार तुम्हाला दर महिन्याला, तीन महिन्यातून एकदा, सहा महिन्यातून एकदा आशा तुम्हाला आवश्यक त्या टप्प्यांमध्ये पेन्शन मिळू शकते. जर अडचणीच्या काळात तुम्हाला पैशाची गरज लागली तर गुंतवलेले सर्व पैसे तुम्ही काढून घेऊ शकता.
या प्लॅन साठी गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार जर अपंग असेल तर या योजनेमध्ये त्याला विशेष पर्याय उपलब्ध मिळतील. या प्लॅनमध्ये गुंतवलेल्या रकमेची कर्जाची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देण्यात आलेली आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर तीन महिन्यानंतर त्या रकमेवर तुम्ही लोन सुद्धा मिळवू शकता. या कारणामुळे तुमची रक्कम सुरक्षित आणि तुम्हाला हवी तशी तुम्ही वापरात आणू शकता. रिटायर झाल्यानंतर या प्लॅनचा तुम्हाला फायदा चांगल्या पद्धतीने मिळेल.
गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसी धारकाचा जर रिटायरमेंटच्या अगोदरच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांच्या या पॉलिसी संदर्भात सर्व निर्णय जातील. यानुसार त्यांच्याकडे पॉलिसीचे सर्व पैसे काढून घेण्याचा किंवा मासिक पेन्शन मिळवण्याचा पर्यायी अधिकार असणार आहे. तुमच्या कुटुंबाकरिता हा एक चांगला पर्याय तुम्हाला मिळणार आहे.
LIC Retirement Plan | या पॉलिसी प्लॅन करिता गुंतवणूक कशी करायची ?
एलआयसी चे पॉईंट ऑफ सेल असणारे अशा व्यक्तींकडून तुम्ही गुंतवणुकीसंदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे या गुंतवणूक करिता अर्ज सुद्धा मिळवू शकता. नजीकच्या एलआयसी ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. प्लॅन खरेदी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण चौकशी तुम्ही करावी आणि खात्री पटल्यावरच गुंतवणूक करावी. हा प्लान खरेदी करण्याकरिता एलआयसी एजंट किंवा अधिकाऱ्यांची संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी एलआयसीच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या.
निष्कर्ष
LIC Retirement Plan | एलआयसी मध्ये केली जाणारी गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे भारत देशातील सर्व नागरिक यांची गुंतवणुकी करिता पहिली पसंती एलआयसी ला असते. एलआयसीच्या सदरील प्लॅन ची आवश्यकता खास करून नोकरदार वर्गाला रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळण्याकरिता करण्यात येणार आहे. या प्लॅननुसार एक फिक्स रक्कम दर महिन्याला रिटायरमेंट नंतर मिळणार आहे. यातील सर्व गोष्टी जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांनी नजदीक च्या एलआयसी शाखेमध्ये संपर्क साधावा.
सध्या बाजारामध्ये रिटायरमेंट साठी बरेच विमा प्लॅन विकले जात आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा आणि फायद्याचा प्लॅन असणारा नवीन प्लॅन हा बाजार मध्ये आलेला आहे. सर्व क्षेत्रातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.