Jio and Elon Musk | इलॉन मस्क आणि जियो मध्ये महत्वपूर्ण मोठा करार..!

Jio and Elon Musk

Jio and Elon Musk | दूरसंचार क्षेत्रामध्ये भारतात एक मोठी घडामोड झालेली समोर आलेली आहे. यामध्ये जियो प्लॅटफॉर्म लिमिटेड या मुकेश अंबानी यांच्या आणि इलॉन मस्क यांची स्पेस-एक्स च्या स्टार लिंक द्वारे भारतामध्ये ब्रॉडबँड सेवा उपग्रहावर आधारित सुरु करण्याचे किंवा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक करार केलेला आहे. भारती एअरटेल या कंपनीद्वारे स्टार लिंक सोबत भागीदारी असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यानंतर लगेच जियो ने इलॉन मस्क यांच्यासोबत एक मोठा करार केल्याचे समोर आलेले आहे. भारत देशामधील ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये इंटरनेटच्या सेवा जलद पोहचवणे करिता याचा फायदा होणार आहे. जॉन से

Jio and Elon Musk | जियो- स्टार लिंक यांच्यातील भागीदारी आणि त्यामुळे होणारी डिजिटल क्रांती.

जगामध्ये असणाऱ्या मोबाईल नेटवर्क कंपन्यांपैकी जियो ही एक मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी आहे. लो अर्थ ऑर्बिट ऑपरेटर उपग्रह सेवांमधील स्टर लिंक हा एक महत्त्वाचा आघाडीचा असलेला ऑपरेटर आहे. भारताच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याकरिता या दोन कंपन्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे.

जियो एअर फायबर आणि जियो फायबर या सेवांमध्ये स्टार लिंक तंत्रज्ञान आल्यामुळे मोठे सुधारणा केली जाणार आहे. हा करार झाल्यामुळे जे ग्राहक जिओचे आहेत त्या ग्राहकांना स्टार लिंक ची सेवा जियो स्टोअर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मिळणार आहे. भारतीय इकोसिस्टीम मध्ये या दोन्ही कंपन्या इतर भागीदारांच्या संधीचा शोध घेत असल्याची शक्यता दर्शवली जात आहे.

Jio and Elon Musk | परवडणारे आणि जलद मिळणारे इंटरनेट

मॅथ्यू  ओमन हे जियो ग्रुपचे सीईओ आहेत त्यांनी सांगितल्यानुसार ” भारतातील प्रत्येक नागरिकाला जलद आणि परवडणारे इंटरनेट मिळावे, हाच जियो ग्रुपचा उद्देश आहे. स्पेस एक्स सोबत आल्यामुळे आम्ही ब्रॉडबँड सेवा अखंड कनेक्टिव्हिटी च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत आहे “

Jio and Elon Musk | जियो ची ब्रॉडबँड सेवा अधिक बळकट

स्टार लिंक ची उपग्रह तंत्रज्ञान आधारित इंटरनेट सोय ही जियो एअरफाइबर आणि जियो फायबर या सेवांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. विश्वासार्ह आणि जलद गती इंटरनेट सेवा पुरवण्या करिता ही भागीदारी महत्त्वाची ठरलेली आहे.

Gwynne Shotwell हे स्पेस एक्स कंपनीचे अध्यक्ष आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ” जियो सोबतची भागीदारी भारताच्या डिजिटल भविष्याचा विचार करण्यासाठी महत्त्वाचे आहे. भारत सरकारकडून परवानगी घेऊन भारतामध्ये लवकरच स्टर लिंक सेवा सुरू होणार आहे “

इंटरनेट सेवन करिता भारतीय मार्केटमध्ये मोठी स्पर्धा

इंटरनेट सेवा भारतामध्ये पुरवठा करण्याकरिता मोठे स्पर्धा असल्याचे दिसून आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने दिग्गज कंपन्यांमध्ये एअरटेल आणि जियो या दोन कंपन्यांमध्ये पूर्वीपासून अधिक तीव्र स्पर्धा आहे. जियो कंपनीला स्टार लिंकचा उपयोग करून देशांमधील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये इंटरनेटचा पुरवठा करण्यात येईल. यामुळे एअरटेल कंपनी पुढे एक मोठे आव्हान उभे राहील. याद्वारे हा करार जर स्पेस एक्स कंपनीला भारतामध्ये स्टार लिंक सेवा सुरू करण्याकरिता सरकारी परवानगी मिळाल्यानंतरच पूर्ण करण्यात येईल.

जियो आणि स्टार लिंक यांची भागीदारी इंटरनेट क्रांति करिता महत्त्वपूर्ण

भारतामधील सर्वात मोठी असलेली रिलायन्सची जियो आणि स्पेस एक्स च्या स्टार लिंक यांच्यामधील असलेली भागीदारी भारताच्या डिजिटल भविष्य ठरवणारी असणार आहे. याचा फायदा म्हणजे भारतामध्ये हायस्पीड इंटरनेट सहजरीत्या उपलब्ध राहणार आहे. यामुळे सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये जियो सर्वात आघाडीवर आहे. आणि प्रतिस्पर्धी कंपनीवर जिओनी मोठी आघाडी मिळवलेली असल्याचे समोर आलेली आहे.

Jio and Elon Musk | निष्कर्ष

जियो आणि स्टारलिंक यांच्यात झालेली ऐतिहासिक भागीदारी भारताच्या डिजिटल क्रांतीसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या करारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये जलद आणि परवडणाऱ्या इंटरनेट सेवांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने जियो फायबर आणि जियो एअर फायबर यासारख्या सेवांमध्ये मोठ्या सुधारणा होतील, ज्यामुळे देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.

या भागीदारीमुळे भारतीय इंटरनेट मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होणार असून, विशेषतः एअरटेलसाठी हे मोठे आव्हान असेल. मात्र, हा करार अंतिमतः सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल. जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर भारतातील इंटरनेट सेवांमध्ये आमूलाग्र बदल घडून येईल आणि डिजिटल भारताचे स्वप्न साकार होण्यास गती मिळेल.

Leave a Comment