महाराष्ट्रामधील नागपूर येथे एच.एम.पी.व्ही या नवीन व्हायरसचे दोन रुग्ण एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आढळून आलेले आहेत. खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एक रुग्ण 14 वर्षाचा मुलगा आहे तर दुसरा मुलगा सात वर्षाचा आहे. या दोघांवर उपचार केल्यानंतर दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
डॉक्टर दीपक सेलोकर हे नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असे सांगितले की ” आम्ही खाजगी रुग्णालयातून नमुने घेऊन त्यांना खरंच एच.एम.पी.व्ही ची लागण झाली आहे का हे तपासत आहोत “
एच.एम.पी.व्ही हा व्हायरस सध्या चीनमध्ये वेगाने पसरत आहे. एच एम पी व्ही म्हणजे ह्यूमन मेटा न्यू व्हायरस असे त्याचे नाव आहे. या व्हायरसने आता भारतात सुद्धा एन्ट्री केलेली आहे. यापूर्वी कर्नाटक राज्यामध्ये या आजाराचे दोन रुग्ण निदर्शनात आलेले होते.
भारतामध्ये या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर भारत सरकारद्वारे आरोग्य मंत्रालयाने कोणालाही घाबरायची गरज नाही. असे पत्रकाद्वारे सांगितलेले आहे.
कर्नाटक राज्यामध्ये हे रुग्ण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणी मध्ये आढळलेले होते. अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी दिलेली आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्यानुसार ताप किंवा इतर संसर्गाच्या आजारांमध्ये श्वसनाच्या आजारामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही असे सांगण्यात आलेले आहे.
कोविड-19 प्रमाणेच या आजाराची लक्षणे असल्याचे सांगण्यात येत आहे. कोविड-19 च्या विषाणूच्या पसरल्यामुळे संपूर्ण जग आधारलेले आपण पाहिलेले होतेच. त्यातच हा नवीन व्हायरस आल्यामुळे संपूर्ण जग चिंतेत पडलेले आहेत.
चीन आणि शेजारील देश या आजाराच्या प्रसारणामुळे आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे भारतीय आरोग्य यंत्रणेने कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. असे सांगितलेले आहे.
परंतु या आजाराचे कर्नाटक येथे दोन रुग्ण आढळल्यामुळे चिंतेमध्ये वाढ झालेली आहे.
HMPV Virus या आजाराबद्दल भारतीय डॉक्टरांचे काय मत आहे ?
डॉक्टर सुरेश गुप्ता हे दिल्ली मधील सर्व गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर आहेत. यांनी वृत्तपत्राशी बोलताना अशी माहिती दिलेली आहे की हा कोणताही नवीन विषाणू नाही आहे. असे सांगितले आहे. ” याबाबत वीस वर्षापासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या काळात या संसर्गाचे प्रकरण समोर येत असतात. हा फ्लू सारखा विषाणू आहे ” यावर औषध म्हणजे सामान्य सर्दी करता देण्यात येणारी औषधे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी दिली जातात असे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे जी व्यक्ती आजारी पडलेली आहे अशा व्यक्तीला आराम करायचे सांगण्यात येते. यामध्ये बहुतांश रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल न करण्याचा सल्लाही देण्यात येतो. असे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी सांगितलेले आहे.
HMPV Virus या आजाराची खबरदारी म्हणून काय करावे ?
* तोंडावर आणि नाकावर रुमाल ठेवून खोकणे किंवा शिंकणे
* आपला हात वारंवार साबणाने स्वच्छ करणे किंवा सॅनिटायझर ने स्वच्छ करणे.
* सार्वजनिक ठिकाणांपासून ताप सर्दी किंवा खोकला येत असल्यास लांब राहणे.
* लक्षणे जाणवत असताना पौष्टिक आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे.
HMPV Virus आजाराची खबरदारी म्हणून काय करू नये ?
* रुमालाचा, टिशू पेपर चा परत उपयोग करू नये.
* लोकांना भेटताना हस्तांदोलन करू नये.
* संसर्ग टाळण्याकरिता तोंडाला, नाकाला, डोळ्याला वारंवार स्पर्श करू नये.
* डॉक्टरांचा सल्ला घेऊन नंतरच औषधोपचार सुरू ठेवावा.
HMPV Virus आजाराची सुरुवात कशी झाली ?
चीनमधील रुग्णालयांमध्ये गर्दी असलेली दृश्य सोशल मीडियावर व्हायरल पहिला सुरुवात झाली होती. याचा शोध घेतला असता. ही गर्दी रुग्णांना ताप येणाऱ्या लक्षणाच्या आजारा संदर्भात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे परत एकदा नवीन आजाराची दहशत चीनमध्ये पसरत असल्याचे समजले. लोक चिंतीत होते. काही वर्षांपूर्वीच कोरोना आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातलेले होते. या कोरोना आजाराची सुरुवात सुद्धा चीनमधून झालेली होती.
त्याचप्रमाणे या आजारातून मध्ये सुद्धा ताप येणे आणि श्वसनाचे विकार होणे आपल्याला समजले जात आहे. हा आजार सुद्धा संसर्गजन्य असल्याचे पुढे चीन सरकारद्वारे सांगण्यात आले. निमोनिया सारखाच हा आजार असल्याचे चीन द्वारे सांगण्यात आले. या आजारामध्ये बाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये 14 वर्षांखालील मुलांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येते.