Dhananjay Munde Bell’s Palsy | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना बेल प्लासी नावाचा एक दुर्मिळ आजार झालेला आहे. या आजारास संदर्भात माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे. हा आजार होण्याचे मुख्य कारण असे सांगण्यात येते की तणाव, संसर्ग किंवा मधुमेह या तीन गोष्टींमुळे चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत झाल्यामुळे हा आजार होऊ शकतो.
बेलस प्लासी हा दुर्मिळ आजार महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना झाला असल्याचे सांगण्यात आलेले आहे. सध्या धनंजय मुंडे या आजारावरती मुंबई येथील रिलायन्स रुग्णालय मध्ये उपचार घेत आहेत. सलग दोन मिनिटे त्यांना बोलताना सुद्धा या आजारामुळे त्रास होत आहे. बोलताना त्यांना अडथळा निर्माण होत आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटर द्वारे ट्विट करत याबाबत माहिती सर्वांना दिलेली आहे. हा आजार नेमका कसा होतो ? या आजाराची सुरुवातीची लक्षणे काय असतात ? आजार झाल्यानंतर काय करावे ? यासंदर्भातील माहिती खालील प्रमाणे आहे.
Dhananjay Munde Bell’s Palsy | बेल्स प्लासी कसला आजार आहे ?
हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत होतात . चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत झाल्यामुळे चेहरा वाकडा होण्याची सुद्धा शक्यता असते. चेहऱ्याच्या स्नायूंवर ती हळूहळू परिणाम व्हायला सुरुवात होतो. पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीप्रमाणे चेहऱ्याची एक बाजू अंशता पॅरालिसिस होते. व्यक्तीला लकवा मारल्यासारखे त्याच्या चेहऱ्यावरती जाणवायला लागते. चेहरा प्रमाणेच त्याच्या डोळ्यांवरतीही या आजारामुळे परिणाम होतो. डोळ्याचे स्नायू तणावात जातात किंवा कमकुवत होतात. यामुळे डोळा बंद करणे त्रासदायक ठरते. व्यक्तीला हसण्या करिता सुद्धा त्रास होतो. हा आजार प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींना किंवा ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे. अशा व्यक्तींना होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार घेतल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर या आजाराची लक्षणे नाहीसे होतात. आणि आजार बरा व्हायला सुरुवात होते.
Dhananjay Munde Bell’s Palsy | बेल्स प्लासी या आजाराची प्रमुख लक्षणे खालील प्रमाणे.
1. चेहऱ्या वरती एका बाजूला कमजोरी येणे किंवा लखवा आल्यासारखे जाणवणे.
2. डोळे बंद करताना आणि तोंड बंद करताना अडथळा निर्माण होणे.
3. जेवण करताना किंवा बोलण्यामध्ये अडथळा तयार होणे.
4. चेहऱ्याचा एक भाग सुन्न होणे किंवा त्यावरती मुंग्या आल्यासारखे होणे.
5. जिभेला चव समजण्याकरिता अडचण निर्माण होणे.
6. कानाखाली किंवा कानाच्या आजूबाजूला वेदना निर्माण होणे.
7. अचानक संवेदनशीलता वाढते.
कोणत्या कारणांमुळे बेल्स प्लासी हा आजार होतो ?
जास्त तणाव निर्माण झाल्यामुळे किंवा मानसिक दडपणामुळे बेल्स प्लासी हा आजार निर्माण होऊ शकतो. जागतिक तिच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्या व्यक्तींना अचानक थंडी लागते अशा व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. ज्या व्यक्तींना डायबिटीज किंवा इतर काही आरोग्याच्या समस्या असतील तर हा आजार त्यांना सुद्धा उद्भवू शकतो. काही संशोधनात हे पुढे आले आहे की मिठाचा वापर जेवणामध्ये अधिक केल्याने हा आजार निर्माण होऊ शकतो. रक्तदाब वाढवण्याकरिता मिठाचा वापर केला जातो. आणि यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. मेंदूतील होणाऱ्या क्रिया मुळे चेहऱ्यावर स्ट्रोक येण्याचे चान्सेस असतात.
उपचार कशा पद्धतीने करावेत ?
1. या आजाराकरिता तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
2. उपचारा सोबतच चेहऱ्याच्या संबंधित व्यायाम त्याचबरोबर फिजिओथेरपी करणे फायदेशीर ठरते.
3. चेहऱ्याला गरम पाण्याने शेकणे किंवा मालिश करणे फायदेशीर ठरते.
4. डोळ्याची पापणी जागताना अडचण येत असल्यामुळे जर डोळे कोरडे पडत असतील तर आय ड्रॉप वापरावा.
5. बेल्स प्लासी हा आजार उपचार सुरू झाल्यानंतर काही महिन्यात किंवा आठवड्यात आपोआप बरा होतो.
6. आजारावर कोणताही प्रकारचा उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बेलस प्लासी या आजाराचा सर्वाधिक धोका कोणाला असतो ?
1. गर्भवती महिला, ज्यांना मधुमेह आहे असे, शीतज्वर असणारे रुग्ण, कायम सर्दी असणारे रुग्ण किंवा इतर श्वसनाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना हा आजार झाल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
2. हा आजार प्रामुख्याने पुरुष आणि महिला दोन्ही वर्गांमध्ये समप्रमाणात दिसतो. 15 वर्ष पासून ते 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते.
Dhananjay Munde Bell’s Palsy | बेल्स प्लासी या आजाराचे निदान कसे करावे ?
या आजाराचे निदान करण्याकरिता तुम्हाला न्यूरोसर्जन ची मदत घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरील एक न्यूरोसर्जन तुम्हाला विविध प्रश्न विचारेल. त्यामध्ये तुमची लक्षणे काय आहेत यापासून तो सुरुवात करेल. चेहऱ्यावरील मांसपेशींचे काम सुरळीत चालली आहे की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल तपासणी सुद्धा करतील. या चाचण्यांमध्ये प्रामुख्याने एमआरआय, सिटीस्कॅन, ब्लड टेस्ट यांसारख्या चाचण्यांचा समावेश असू शकतो.