CM Fellow Ship Program | आता तरुणांच्या आयुष्याला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांकडून सरकारमध्ये थेट काम करण्याची एक वेगळीच संधी आता उपलब्ध झालेली आहे. ही संधी नक्की कशा करिता आहे ? या संधी करिता पात्रता काय लागणार आहे? आणि या संधी करिता अर्ज कसा करायचा ? याबाबत सविस्तर जाणून घेण्याकरिता खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचा.
” मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ” हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून साखर ला गेलेला दूरदृष्टी असलेला कार्यक्रम आहे. महाराष्ट्र राज्यामधील एकूण 60 तरुणांना प्रशासनामध्ये काम करण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्यासोबत काम करून प्रशासनाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात सहभागी होता येणार आहे.
2025-26 या राजकीय वर्षांमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन जाहीर झालेली आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता तरुणांच्या असणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि त्यामधील कौशल्य आणि ताज्या दृष्टिकोनाचा उपयोग प्रशासनाला होण्याकरिता ही योजना राबवलेली आहे. अर्थ व सांख्यिकी विभाग नियोजन विभाग संचालनालयामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
CM Fellow Ship Program | फेलोशिप योजना काय आहे ?
सदरील फेलोशिप योजनेचा कालावधी 12 महिना करिता असणार आहे. या योजने करिता निवड झालेल्या उमेदवारांना 56100 रुपये दरमहा मानधन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासाचा खर्च म्हणून त्यांना 5400 रुपये देण्यात येणार आहेत. 61500 रुपये त्यांना दरमहा मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण या विषयांमधील विशेष पदव्युत्तर प्रमाणपत्र चा अभ्यासक्रम चा अभ्यासक्रम सुद्धा फेलोन करिता आयोजित केला गेलेला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारच्या व्याख्यानांचा समावेश असणार आहे. या व्याख्यानाच्या द्वारे तरुणांना प्रशासकीय कामकाजामध्ये उपयुक्त पडणारी महत्त्वाची कौशल्य शिकता येणार आहेत.
CM Fellow Ship Program | पात्रता काय असणार आहे ?
1. वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 26 वर्षापर्यंत अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत असले पाहिजे.
2. शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
3. अनुभव : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी एक वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामध्ये इंटर्नशिप, व्यावसायिक अनुभव, स्वयंरोजगार इत्यादी अनुभव ग्राह्य धरले जातील.
4. भाषा आणि कौशल्य : सदरील पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे संगणक चालवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
6. शुल्क : सदरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क ₹500 असणार आहे.
CM Fellow Ship Program | निवड प्रक्रिया :
ऑनलाइन चाचणी, निबंध लेखन, मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन चाचणी या पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाइन संगणकाद्वारे वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्यात येईल. यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना फक्त 210 जणांना निबंध लेखन करिता पुढे पाठवण्यात येईल. त्यानंतर शेवटी मुलाखत घेण्यात येईल. सर्वांच्या मुलाखती मुंबईला होतील. सर्व प्रक्रियेमधून निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यामधील 20 निवडक जिल्ह्यांमध्ये नियुक्ती मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणता दोन ते तीन उमेदवार काम करत असतील.
1. सदरील भरती मधील एक तृतीयांश जागा ह्या महिलांकरिता राखीव असणार आहेत. या भरतीमध्ये महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागांवर पुरुष उमेदवाराला संधी देण्यात येईल.
2. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांचा दर्जा गट अ अधिकार यांप्रमाणे असेल.
3. सदरील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबई यांच्याकडून सुद्धा स्वतंत्र प्रमाणपत्र देण्यात येईल.
CM Fellow Ship Program | अर्ज कधी आणि कोठे करायचा ?
अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. सदरील पदाकरिता अर्ज करण्यासाठी आधार कार्ड किंवा ओळखपत्र आवश्यक असणार आहे. यापूर्वी जर कोणत्याही उमेदवाराने सदरील योजनेचा योजनेद्वारे पदाचा लाभ घेतला असेल तर तो उमेदवार पुन्हा पात्र ठरणार नाही.
योजनेद्वारे करिअरला नवीन दिशा द्या.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिला कार्य काळामध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला होता. 2023-24 या सालामध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला गेलेला होता. त्यानंतर आता 2025-26 यावर्षी हा उपक्रम पुन्हा नव्याने सुरू होत आहे. याद्वारे प्रशासनामध्ये काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. त्याद्वारे त्यांच्या करिअरला नवीन दिशा सुद्धा मिळणार आहे.
CM Fellow Ship Program | महाराष्ट्र राज्याच्या विकासात हातभार लावा.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे केले गेलेल्या आव्हाना मधून तरुणांना सरकार सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. ” तरुणांची कल्पकता, ऊर्जा आणि तंत्रज्ञानामधील प्रभुत्व यांच्याद्वारे प्रशासनाला नवी गती देण्यात येईल. तर या संधीचा फायदा घेऊन तरुणांनो राज्याच्या विकासाला हातभार लावा ” असे विधान त्यांनी केलेले आहे.