Chhaava Movie | शिर्के कुटुंबीय छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर आक्रमक

Chhaava Movie

Chhaava Movie | सध्या भारत देशामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला सिनेमा ” छावा ” हा संपूर्ण देशभर गाजत आहे. असे सुरू असतानाच या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणाऱ्या काही गोष्टींमुळे हा चित्रपट सध्या वादामध्ये अडकलेला दिसत आहे.

अभिनेता विकी कौशल याने या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची केलेली भूमिका पाहून विकी कौशल यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट इतिहासावर आधारित असल्यामुळे त्यातील घडामोडींचे व्यवस्थित व अचूक चित्रीकरण न झाल्याचा आरोप घेऊन चित्रपटांमधील काही प्रसंगावर ती शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतलेला आहे.

हा आक्षेप घेत असताना शिर्के कुटुंबीयांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते. शिर्के कुटुंबीयांनी लक्ष्मण उतेकर यांना पुरावे दाखवण्या संदर्भात नोटीस पाठवलेली आहे. त्याचबरोबर छावा कादंबरी प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांना सुद्धा पुरावे दाखवण्या संदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे. हा चित्रपट शूटिंग करण्यापूर्वी किंवा प्रदर्शित करण्यापूर्वी दिग्दर्शकांनी शिर्के कुटुंबीयांसोबत चर्चा करायला हवी होती. त्याचबरोबर या चित्रपटासंदर्भात शिर्के कुटुंबीयांची मत जाणून घ्यायला पाहिजे होते. परंतु असे कोणतेही सल्ला दिग्दर्शकांनी घेतलेला नाही. यामुळे शिर्के कुटुंबीय यांनी दिग्दर्शकांना महाराष्ट्रभर फिरू देणार नाही असे सांगितलेले आहे. महाराष्ट्रभर फिरून न देण्याचा इशारा दीपक शिर्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर हा विषय इथेच संपला नसून या विषयाबद्दल संपूर्ण राज्यभर आंदोलन चालू ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.

सदरील चित्रपट ” छावा ” या चित्रपटामध्ये शिर्के घराण्याला बदनाम करण्याकरिता चित्रपटामध्ये जाणीवपूर्वक इतिहास बदलला गेलेला आहे. शिर्के घराण्याची बदनामी षडयंत्र करून करण्यात आलेली आहे. राजे शिर्के घराण्याला टारगेट करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळेस पत्रकार परिषदेत केलेला आहे.

राजेश शिर्के घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे. राजे शिर्के घराण्याचा योगदान हे मोठे आहे. राजे शिर्के घराणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गद्दारी केल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. पुरावे नसताना सुद्धा असे आरोप का व कसे केले जात आहेत ? इतिहासामध्ये चुकीच्या गोष्टी आणून दाखवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे खरा इतिहास गायब केला जात आहे. राजे शिर्के कुटुंबीय चित्रपटाच्या विरोधामध्ये नाहीत. परंतु या चित्रपटामध्ये खलनायक चुकीचा दाखवला गेलेला आहे. समाजाला चुकीचे मार्गदर्शन करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम याद्वारे केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा ठाव ठिकाणा सांगण्याचे काम गणोजी शिर्के यांनी केलेले नाही असा यावेळी शिर्के कुटुंब यांनी दावा केला. सिनेमॅटिक लिबर्टी करिता छावा चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला गेलेला आहे. असा आरोप शिर्के यांनी केलेला आहे.

Chhaava Movie | राजे शिर्के घराणे संदर्भात माहिती

Chhaava Movie | छत्रपती संभाजीराजे यांचे मेहुणे गणोजी पिलाजी शिर्के हे होते. महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी यांचे ते भाऊ होते. त्याचप्रमाणे कान्होजी शिर्के यांचे सुद्धा ते भाऊ होते. राजकुवर बाईसाहेब यांचे गणोजी पिलाजी शिर्के हे पती होते. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यामध्ये वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनीच महाराजांचा विश्वासघात केल्याची माहिती छावा चित्रपटातून आणि कादंबरी मधून मिळालेली आहे.

शृंगारपूर- दाभोळ या परिसरामध्ये वतना वरती गणोजी पिलाजी शिर्के यांचा हक्क होता. वतना वरती त्यांचे नाव असावे असे त्यांची इच्छा होती. परंतु सर्वसामान्य लोकांना किंवा जनतेला त्रास देण्याचे काम वतनदार करत असत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात वतन देणे बंद करण्यात आलेले होते. त्याऐवजी ऐवजी त्यांनी त्या भागातील सरदारांना वेतन द्यायला सुरू केलेले होते. ज्यावेळेस गणोजी शिर्के रायगडावरती वतन मागण्याकरिता आलेले होते तेव्हा महाराणी येसूबाई यांनी त्यांना वतना करिता स्पष्ट नकार दिलेला होता. त्यानंतर थेट त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत भेटून स्वतःसाठी वतन मागितलेले होते. परंतु महाराजांनी स्वतःचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणाचा अहवाल देत वतन देण्यास नकार दिला. आणि यापुढे कधीही कोणाला वतन देणार नाही असे त्यांनी सांगितले. असे घडल्यामुळे गणोजी शिर्के स्वराज्य सोडून मोगलांना जाऊन मिळाले. त्याचबरोबर गणोजी शिर्के यांना कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांची असलेली मैत्री मुळीच पटत नव्हती. छत्रपती संभाजी महाराज यांनी कलश यांच्या वरती मलकापूर परिसराची पाहणी करण्याकरिता पाठवलेले होते याच्यामागे मुख्य कारण देसाई आणि शिर्के यांच्यातील वाद मिटवणे होते. यावेळेस कवी कलशांवर गणोजी शिर्के यांनी हल्ला केलेला होता. संभाजी महाराजांना ही बातमी समजतातच त्यांनी कवींच्या मदतीकरिता आगे कुछ केली त्याचबरोबर त्यांना शृंगारपूर जवळील कोकणातील संगमेश्वर जवळ येण्यास सांगितले. ही बातमी गणोजी शिर्के यांनी मुघल सेनापती मुखरब खान यांना कळवली. मुखरब खान ही मुघल सैन्य घेऊन संभाजी महाराजांना पकडण्याकरिता निघाला.

Leave a Comment