Karjat Meyor | कर्जतच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का!

Karjat Mayor

Karjat Mayor | Jभाजपाच्या स्थापना दिनादिवशी कर्जत शहराच्या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल झालेला आहे. हा ठराव दाखल करण्याच्या वेळेस काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक आणि शरद पवार पक्षाचे आठ नगरसेवक भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत.

राज्याच्या राजकारणामध्ये कर्जत नगर पंचायती मध्ये सोमवारी घडलेली राजकीय घटना चर्चेचा विषय ठरलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या एकूण 11 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात एकत्र येत कर्जतच्या नगराध्यक्ष असलेल्या उषा राऊत यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव दाखल केलेला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनीच ही घटना घडली असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये ही घटना नाट्यमय ठरलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना या कारवाईमुळे मोठा धक्का बसलेला आहे. कारण आता फक्त चार नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडे राहिलेले आहेत.

Karjat Mayor | निर्णयासाठी गुप्त बैठका

विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी रात्री कर्जत नगरपरिषदेतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक गुप्तपणे झाली. भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. बैठकीत ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता सोमवारी 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वासाचा ठराव दाखल केलेला आहे. बंडखोरांना एकत्र आणण्याकरिता आणि मध्यस्थीची भूमिका प्रवीण घुले यांनी बजावलेली आहे. यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

Karjat Mayor | विजय तीन वर्षांपूर्वीचा

तीन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा किल्ला असलेला कर्जत नगर पंचायती मध्य रोहित पवारांनी एक हाती विजय मिळवत भाजपाचा बालेकिल्ला उध्वस्त केलेला होता. 12 नगरसेवक राष्ट्रवादीकडे, काँग्रेसकडे तीन नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाकडे दोन नगरसेवक होते. उषा राऊत यांची नगराध्यक्ष पदी निवड झालेली होती तर रोहिणी घुले काँग्रेसच्या यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झालेली होती. आता मात्र संख्याबळ आणि त्यांचे समीकरण पलट्या मुळे अविश्वासाचा ठराव दाखल झालेला आहे.

Karjat Mayor | नगरसेवकांची निराशा

सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धती वरती नगरसेवकांचा रोष होता. अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांचा राजीनामा मिळाला नाही. सातत्याने सत्ता स्थान एका घराण्याच्या हातामध्ये राहत असल्याने त्याचप्रमाणे उषा राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बाबत लोकांमध्ये नाराजी होती. यामुळे सर्व नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर ती विश्वास गमावला असे आरोप केलेले आहेत.

Karjat Mayor | नगराध्यक्ष राजीनामा देण्यास तयार

उषा राऊत नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये असे सांगितले की यापूर्वीही त्या राजीनामा देण्यास करिता तयार होत्या आणि आजही त्या राजीनामा देण्यासाठी तयार आहेत. परंतु नगरसेवक यांनी बंडखोरी करण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क करायला पाहिजे होता. त्यांच्या महत्वकांक्षा रोहित पवार यांनी मान्य केले असता. असे त्यांनी सांगितले आहे.

Karjat Mayor | किंग मेकर प्रवीण घुले

भारतीय जनता पक्षाचे प्रवीण घुले हे या सर्व राजकीय घडामोडी मध्ये किंग मेकर ठरले असल्याचे समजले जात आहे. त्यांनी बंडखोर नगरसेवकांची एकत्रित मुठ बांधली. भाजपासोबत यशस्वीपणे चर्चा केली आणि त्यांना एकत्रित अज्ञात स्थळी नेऊन सर्व परिस्थिती वरती योग्य नियंत्रण ठेवले. त्यांची उपस्थिती फोटो सेशन मध्ये सुद्धा दिसून आलेली आहे. त्यामुळे त्यांचा सिंहाचा वाटा भाजपाच्या यशामागे मानला जात आहे.

Karjat Mayor | राजकीय समीकरणे बदलणार

जिल्हाधिकाऱ्यांकडून आता अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे मतदानाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहिली जात आहे. नगरसेवकांची संख्या बळ जास्त असल्यामुळे जवळपास ठराव यशस्वी होण्याचा निश्चिती असल्याचे सांगितले जात आहे. कर्जत जामखेड तालुक्यामधील आणि कर्जत शहरांमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार असल्याचे समजत आहे.

Karjat Mayor | रोहित पवारांना धक्का

स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये रोहित पवार का होत असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झालेले आहे. या घटनेचा परिणाम आगामी निवडणुकीच्या काळामध्ये होणार आहे. तर भाजपाने राजकारणामध्ये आणि खास करून स्थानिक राजकारणामध्ये स्वतःचे बळकटीकरण केलेले आहे. त्यांच्या या रन नैतिक चातुर्याचा उत्तम नमुना या घटनेमध्ये दिसून येत आहे.

Leave a Comment