50 Litres Milk Production | शेतकऱ्यांच्या समृद्धीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी केलेली होती. दुग्ध व्यवसाय आपण 1980 नंतर पुढाकार घेतल्यामुळे तालुक्यात वाढवलेला आहे. आज संगमनेर तालुक्यामध्ये 89 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. येत्या काळामध्ये कमी गाई मध्ये जास्त दुधाचे उत्पादन घेण्याकरिता राजहंस दूध संघाच्या वतीने उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नवीन 50 लिटर दूध देणाऱ्या गाईंची निर्मिती करण्याचा घेतलेला उपक्रम हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेले आहे.
मिशन 50 लिटर अंतर्गत कालवड संगोपनाच्या घेतलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब थोरात बोलत होते. या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष चेअरमन रणजितसिंह देशमुख हे सुद्धा उपस्थित होते. लक्ष्मणराव कुटे ( ज्येष्ठ संचालक ) हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. जयश्री ताई थोरात, आर.बी राहणे, मुंबई व्हेटर्नरी विद्यापीठाचे माननीय डॉक्टर अब्दुल समद, उदय तिवारी, विलास कवडे, संचालक विलास वरपे, संतोष खांडेकर, भास्करराव सिनारे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, तुकाराम दातीर, बबन कुराडे, डॉक्टर प्रमोद पावशे, रवींद्र रोहम, मोहनराव करंजकर, कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी, डॉक्टर संतोष गव्हाणे, कारगिल फेड चे भंडारी इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते.
यावेळी प्रदर्शनामध्ये 50 लिटर दूध निर्मिती करणाऱ्या गाई आणि कालवडींचे प्रदर्शन होते. ते संपन्न झाले. राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना असे म्हणाले की संगमनेर तालुक्यामध्ये शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय वाढवण्याकरिता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केलेली होती. त्याकाळी दुधाचे उत्पन्न वाढण्याकरिता मिळावे घेऊन दिशा दाखवण्याचे काम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, डॉक्टरांना साहेब शिंदे, मनीभाई देसाई, आप्पासाहेब पवार यांसारख्या दिग्गजांनी केलेले होते. त्यांच्यानंतर तालुक्यामध्ये दूध वाढवण्याकरिता गावोगावी जाऊन 1980 सालानंतर आपण दूध वाढीकरिता पुढाकार घेऊन काम केलेले आहे.
गावोगावी जाऊन प्रत्येक गावामध्ये दूध सोसायटी निर्माण केल्या. दूध संघाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम राबविल्यामुळे आणि त्याचा फायदा जसा झाला की तालुक्यामध्ये आज एकूण 9 लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. राबवल्या जाणाऱ्या योजनांपैकी मुरघास, एमडीएफ गोठा या योजना यशस्वी झालेले आहे. त्याचे उत्पादन करत असताना जास्त उत्पादन कमी गाईंमध्ये करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उत्पादन केलेल्या दुधाची गुणवत्ता आणि शुद्धता विविध प्रकारे तपासली जाणे गरजेचे आहे. याकरिता सिमेन वापरत असताना इम्पोर्टेड आणि सॉर्टेड वापरणे गरजेचे आहे. याचा उपयोग करूनच 50 लिटर दूध उत्पादन करणारी गाई तयार करता येणार आहे. आणि यामुळे महाराष्ट्राच्या दूर व्यवसायाला नवीन दिशा मिळणार आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
तर या 50 Litres Milk Production | प्रसंगी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की दूध संघाची वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. मुरघास आणि एमडीएस गोठा या यशस्वी योजना आज महाराष्ट्रभर पोहोचलेले आहे. इथून पुढे दूध उत्पादनाला एक व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे. 50 लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याच्या या टप्प्यामध्ये संगमनेर तालुक्यातील 1250 गाईंची नोंदणी केल्यानंतर त्यांना वेळोवेळी लसीकरण करणे, गाईंची रक्त तपासणी आणि शेण तपासणी करणे यांसारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इम्पोर्टेड आणि सॉर्टेड सिमेंट वापरून कालवडींचे उत्पादन करणे गरजेचे आहे.
कालवडीचे उत्पादन केल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये निर्माण केलेल्या कालावधीचे संगोपन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. 50 Litres Milk Production | यामध्ये प्रामुख्याने कालवडींना कोरडा पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. या आहारामध्ये 2kg भुसा, 20 किलो मुरघास आणि पाच किलो खाद्य या प्रकारचे प्रमाण कालवडी ला देणे आवश्यक आहे. गव्हाचा भुसा खायला दिल्यामुळे गाईची पचनक्षमता सुधारते. परंतु हा भुसा खायला देताना योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये जीवनामध्ये भरभराट करण्याकरिता या व्यवसायाचा मोलाचा वाटा असणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला गाईचा आहार, आरोग्य आणि स्वच्छता असलेली असणे गरजेचे आहे.
50 Litres Milk Production | या प्रसंगी मार्गदर्शन करण्याकरिता मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अब्दुल समद, उदय तिवारी विक्रम भंडारी, डॉक्टर परीक्षित देशमुख, विजय विश्वकर्मा यांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे. डॉक्टर प्रमोद पावशे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले. त्याचप्रमाणे डॉक्टर सुजित खिलारी (कार्यकारी संचालक) यांनी प्रास्ताविक सादर केले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट जोंधळे यांनी केलेले होते. तर या प्रसंगी विलास कवडे यांनी आभार मानले.