Suzlon Energy | सुजलोन एनर्जी या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळालेली आहे. या स्टॉक ने जवळपास 9% उसळी दिनांक 7 मार्च 2025 रोजी घेतलेली आहे. गेल्या 20 महिन्यांमध्ये एका दिवसामध्ये शेअरची झालेली वाढ हे 7 मार्च 2025 रोजी सर्वात जास्त होती. आठवड्याला 12% पर्यंतचा परतावा या शेयर द्वारे दिला गेला आहे. मागील पाच दिवसांपासून शेअरची किंमत वाढत असल्याचे दिसत आहे. गुंतवणूकदाराचे लक्ष या शेअर कडे वेधले जाण्याचे मुख्य कारण म्हणजे या शेअर दिलेला मोठ्या प्रमाणात चा परतावा आहे.
Suzlon Energy | मागील 20 महिन्यापासून सर्वात जास्त तेजी
आतापर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती सुजलोन एनर्जी या कंपनीच्या शेअर्स 7 मार्च 2025 रोजी 56. 94 रुपये एवढा उच्चांक गाठलेला होता. सदरील शेअरची वाढ ही खूप महत्त्वाची मानली जात आहे. त्याचं कारण असं आहे की हा शेअर सर्वाधिक जास्त साप्ताहिक परतावा देणारा जुलै 2024 नंतरचा महत्त्वाचा शेअर मानला जात आहे. या सत्रामध्ये शहर 54 .84 रुपये किमतीला बंद झालेला होता. त्यामुळे शेरणे 5.26 % वाढ दिलेली होती.
याच शेअर मागील केजी मध्ये विविध कारणांचा समावेश आहे. शेअर द्वारे देण्यात आलेली ही वाढ पाहून दीर्घकालीन गुंतवणूक गुंतवणूक करू शकतात.
1. व्यावसायिक महत्त्वपूर्ण ऑर्डर
जिंदाल ग्रीन विंड या कंपनीकडून सुजलोन कंपनीने एक मोठी ऑर्डर मिळवलेली आहे. आतापर्यंतच्या मिळालेल्या औद्योगिक ऑर्डर पैकी ही एक महत्त्वाची ऑर्डर मानली जात आहे. या आठवड्यात कंपनीने केलेली ही सर्वात मोठी डील आहे.
यापूर्वी जिंदाल ग्रुप कडून कंपनीला दोन ऑर्डर्स मिळालेल्या होत्या. त्यातच या नवीन ऑर्डर मुळे दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाल्यामुळे दोन्ही कंपन्यांमधील संबंध मजबूत झाले आहेत. कंपनीने केलेल्या या नवीन करारामुळे सुजलोन कंपनीचे ऑर्डर बुक 5.9 गिगावेट पर्यंत गेलेली आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.
2. नवीन गुंतवणूकदारांचा सहभाग
शेअर होल्डिंग डेटा नुसार मार्च 2025 पर्यंत सुजलोन कंपनीमध्ये एकूण किरकोळ गुंतवणूकदार 54.1 लाख आहेत. कंपनीमध्ये त्यांचा एकूण हिस्सा 24.5% इतका देण्यात आलेला आहे.
आतापर्यंत कंपनीने स्वतःचे लोन कमी करून आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे लहान दुकानदार या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
3. सकारात्मक ब्रोकर शिफारसी
सुजलोन एनर्जी शेअर्सच्या बाबतीत अनेक ब्रोकर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहेत. उदाहरणार्थ स्टॉक 70 रुपये च्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला इन्वेस्टक या ब्रोकरेज प्लॅटफॉर्म ने सल्ला दिलेला आहे.
Suzlon Energy | कंपनीच्या विश्लेषण नुसार
2024 ते 2027 या आर्थिक वर्षांचे कंपनीचे आर्थिक उत्पन्न 55% ने दरवर्षी वाढत आहे. 66% दराने कंपनीचा एकूण नफा वाढत आहे. इक्विटी मध्ये गुंतवणूक केलेल्या व्यक्तींचा परतावा 2027 पर्यंत 32 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
Suzlon Energy | सुजलोन एनर्जी कंपनीचा शेअर उच्चांक गाठेल का ?
या कंपनीचा शेअर पूर्वीपेक्षा नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. सध्या एकूण सात विश्लेषक या शेअर बद्दल माहिती कव्हर करत आहेत. त्यापैकी सहा विश्लेषकांचा हा शेअर बाय करण्यात यावा असे सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे एकाने होल्डिंग संदर्भात संकेत दिलेले आहेत.
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या स्टॉकची किंमत पुढील काही महिन्यांमध्ये 20 ते 50 टक्क्यापर्यंत वाढू शकते. त्यामुळे पुढील महिन्यांमध्ये या स्टॉक मध्ये चढ-उतार येऊ शकतो.
गुंतवणूक करणाऱ्या उमेदवारांसाठी संधी आणि जोखीम खालील प्रमाणे
1. संधी :
कंपनीची महसूल क्षमता नवीन ऑर्डर्स मिळाल्यामुळे वाढली जाणार आहे. ऊर्जा क्षेत्राची निगडित नवीन धोरणे आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढत चाललेली गुंतवणूक याचा कंपनीच्या ऑर्डर्स वर सकारात्मक परिणाम जाणवत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ब्रोकरेज हाऊस ने सुद्धा सकारात्मक पणा दाखवलेला आहे.
2. संभाव्य जोखीम :
या कंपनीच्या शेअरची किंमत 36 टक्क्याने उच्चांक खाली आलेली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर किमतीमध्ये काही प्रमाणात अस्थिर पणा राहू शकतो. स्टॉक च्या किमती वरती बाजारातील नकारात्मक घडामोडींचा परिणाम होऊ शकतो.
Suzlon Energy | गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा
सुजलोन एनेर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा शेअर भविष्यामध्ये म्हणजे काही महिन्यांमध्येच 70 ते 82 रुपये दरम्यान जाऊ शकतो. त्यामुळे जे लोक दीर्घकालीन गुंतवणूक करणार आहेत अशाकरिता फायदेशीर ठरू शकते. परंतु कोणीही गुंतवणूक करत असताना बाजारातील स्थितीचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच गुंतवणूक करावी. कमी काळासाठी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नफा बुक करावा. आणि दीर्घकालीन होल्डिंग करणाऱ्यांनी व्यवसायिक होणाऱ्या घडामोडी लक्षात घेऊनच स्टॉक होल्ड करावा.