Pune PMPML News | पुण्यातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 8 मार्च 2025 रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्याकडून महिलांसाठी बस सेवा फ्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सार्वजनिक वाहतूक महिलांसाठी सुलभ आणि सुरक्षित व्हावी यासाठी हे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. कामाला जाणाऱ्या महिला, विद्यार्थिनी आणि गृहिणी या सर्वच महिलांकरिता हा राबवण्यात आलेला उपक्रम एक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्याकडून वयातील सर्व महिलांसाठी मोफत बससेवा महिला दिनानिमित्त देण्यात आलेली आहे. परंतु ही सेवा फक्त प्रमुख मार्गावर चालणाऱ्या बसेस करिताच देण्यात येणार आहे. पुण्यातील प्रमुख 13 महामार्गावर ती एकूण मिळून 15 बसेस चालणार आहेत. या बसेस मध्ये महिलांकरिता तिकीट आकारले जाणार नाही. या बसच्या प्रवासाचा फायदा म्हणजे वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि किफायतशीर करणे. यामुळे महिलांना त्यांच्या प्रवासामध्ये अधिक सुलभता मिळणार आहे. पुणे शहरांमधील महिला बऱ्यापैकी PMPML सेवांचा उपयोग महिला करत असतात. त्याचप्रमाणे सध्या घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर पीएमपीएल ला गिराईक आणि स्टाफ दोन्ही भविष्यात वाढली जाणार आहे.
पुण्यातील 13 प्रमुख मार्गांवर PMPML चा प्रमुख बसेस सेवा सुरू असतात. या बसेस सुरू ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतलेला आहे.
Pune PMPML News | या मार्गावरून मिळणार मोफत बस प्रवास
PMPML कडून महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यातील 13 प्रमुख मार्गावरील बसेसची सेवा महिलांसाठी मोफत पुणे महानगरपालिके कडून देण्यात येणार आहे. शहरातील जास्त गर्दी किंवा जास्त रहदारी असलेल्या ठिकाणावरून महिला प्रवाशांसाठी मोफत प्रवास मिळणार आहे. या मार्गांपैकी महत्त्वाचे मार्ग म्हणजे चिखली ते डांगे चौक, भोसरी ते निगडी, निगडी ते हिंजवडी, पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, भेकराई नगर ते मनपा भवन, हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी, कात्रज ते कोथरूड, कात्रज ते महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, इंडिया गेट ते मनपा भवन, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते धायरी, स्वारगेट ते हडपसर या ठिकाणच्या सर्व बसेस महिलांकरिता मोफत देण्यात येणार आहेत.
Pune PMPML News | महिलांसाठी महत्त्वाचा उपक्रम
ज्या महिलांना दररोज पीएमपीएलच्या बसेसने प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. महिलांकरिता महिला दिनानिमित्त मोफत प्रवास किंवा विनाशुल्क प्रवास हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. महिलांना सुरक्षित आणि जलद प्रवास कर्ता यावा याकरिता पीएमपीएल कडून प्रत्येक वेळेस काळजी घेतली जाते. महिलांप्रमाणेच विद्यार्थिनी सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे हा उपक्रम त्यांच्या साठी सुद्धा एक महत्वपूर्ण बनलेला आहे. पीएमपीएल द्वारे चालवण्यात आलेल्या या उपक्रमाचा फायदा घेऊन महिलांना त्यांचा दैनंदिन प्रवासाचा खर्च वाचवता येणार आहे. महिलांना सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुरक्षितता आणि इतर चांगल्या सुविधा देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी महिलांना या उपक्रमाद्वारे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना याचा कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही. सार्वजनिक वाहतूक सुविधांचा महिलांना लाभ घेता यावा आणि सर्व महिलांनी पीएमपीएलच्या बसेस चा उपयोग करावा याकरिता हा उपक्रम राबवलेला आहे.
Pune PMPML News | सर्वांनी या सुविधांचा लाभ घ्यावा
पीएमपीएल द्वारे महिला दिनानिमित्त चालवलेल्या उपक्रमाचा महिला दिनादिवशी सर्व महिलांना विशेष लाभ घेता येणार आहे. पीएमपीएल प्रशासनाद्वारे सर्व महिलांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे. विद्यार्थिनी, गृहिणी, कामकाज साठी फिरणाऱ्या महिला यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि सार्वजनिक वाहतूक मोफत पणे पार पाडावी.
पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएल कडून भविष्यामध्ये बस ने प्रवास करणाऱ्या महिलांकरिता महत्त्वाच्या सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. फक्त महिलांसाठी सेपरेट बसेस सुरू करणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या बसेस बनवताना महिलांची सुरक्षितता आणि सोयीस्कर सेवा लक्षात घेतली जाणार आहे. महिलांकरिता सुरक्षितता उपाययोजना आणि सोयीस्कर प्रवास करण्याकरिता विविध योजना राबवल्या जाणार आहेत. यामुळे पुण्यामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.