Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार. 2100 रुपये होणार.

Ladki Bahin Yojana


Ladki Bahin Yojana | महिला दिनाच्या निमित्त सायंकाळी पूर्व दिनांक 8 मार्च 2025 रोजी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने चालवलेल्या लाडके बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. ही माहिती आदिती तटकरे ( महिला व बालविकास मंत्री ) यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची बातमी आणि मोठा दिलासा पसरलेला आहे. या योजनेसाठी लाभार्थी असलेल्या महिलांना लवकरात लवकर लाभ मिळावा याकरिता महाराष्ट्र सरकारकडून योजनाची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील पात्र असलेल्या अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचवला आहे. विरोधकांनी सरकारच्या या लाडकी बहीण योजनेबाबत कितीही टीका केली असली तरी सरकारने आतापर्यंत अडीच कोटी महिलांना लाभ दिलेला आहे. दोन कोटी 40 लाख महिलांना जानेवारी महिन्यामध्ये या योजनेचा हप्ता मिळालेला आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा तेवढ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितलेले आहे. या योजनेला जनतेमधून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे.

Ladki Bahin Yojana | महायुतीचे सरकार योजनेबाबत सक्षम

लाडकी बहीण योजनेविषयी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या खोट्या अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. याविषयी स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी असे सांगितले की, सदरील योजना ही विरोधकांच्या डोळ्यांमध्ये खुपत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या योजनेविषयी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदरील योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. ही योजना सातत्याने राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय सरकारचे आहे.

Ladki Bahin Yojana | मार्च महिन्याचा हप्ता विषयी माहिती

मार्च महिन्याचा महिलांना मिळणारा हप्ता याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु याविषयी आदिती तटकरे यांनी माहिती विस्तृतपणे दिलेली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सदरील योजनेचा हप्ता महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थी असलेल्या महिलांनी संयम बाळगावा आम्ही कोणत्याही गैरसमजात पडू नये. असे आव्हान त्यांनी केलेले आहे.

2100 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता होणार

महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कायम आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामध्येच आणखीन एक पाऊल पुढे टाकले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये महिलांना मिळणारा लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 करण्याचा विचार महाराष्ट्र राज्य सरकार करणार आहे. याबाबत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सफल करण्याकरिता हप्त्याची रक्कम वाढवण्याचे निर्णय घेतला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana | महिलांना स्वावलंबी करण्याकडे लक्ष

फक्त आर्थिक मदत करून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना रोजगार आणि व्यवसाय यांच्या संधी सुद्धा योग्य प्रमाणात मिळवून देणे गरजेचे आहे. याकरिता आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देऊन महिला बचत गटांना लघुउद्योग आणि रोजगार याबाबत विविध संधी उपलब्ध करून देणे गरजेचे. या योजनेद्वारे लाखो महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत स्वतःच्या गरजा भागविण्याकरिता मिळत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरण करिता अनेक योजना राबवल्या जात असतात. त्यामध्ये लाडकी बहीण योजना एक महत्वपूर्ण योजना आहे.

निष्कर्ष

8 मार्च 2025 रोजी महिला दिनाच्या दिवशी सायंकाळी च्या अगोदर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. यामुळे लाखो महिलांना त्याचा लाभ होणार आहे. यामुळेच सरकारद्वारे त्यांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचा विचार सुरू आहे. महिला बचत गटांना जालना देऊन महिलांच्या स्वयंरोजगारासाठी संधी निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. कोणत्याही महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. याची अंमलबजावणी होणार आहे त्यावर विश्वास ठेवावा असे सरकारकडून आव्हान करण्यात आलेले आहे.

Leave a Comment