SSC Board Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्याकरिता हे नियम महत्त्वाचे

SSC Board Exam

SSC Board Exam | सध्या 10 वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षांमध्ये आता बारावीची परीक्षा संपायला लागलेली आहे. तर 10 वीचा प्रथम पेपर पूर्ण झालेला आहे. यावर्षी जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्डाचे पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर 12 लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्डाचे पेपर दिलेले आहेत. राज्यामध्ये एकूण यावर्षी 35 ते 36 लाख 10 वी आणि 12 वी चे मिळून एकूण विद्यार्थी आहेत. यामुळे बोर्डाच्या एका नियमानुसार विद्यार्थी पास होऊ शकतात. तो नियम काय आहे त्याबाबत आज आपण खाली दिलेल्या लेखात जाणून घेणार आहोत.

10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा मध्ये सर्वच विषयांवर तोंडी परीक्षा असणार आहे. यामध्ये 12 वी सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या तिन्ही विषयांवर लेखी परीक्षा असणार आहे त्याचप्रमाणे तोंडी परीक्षा सुद्धा असणार आहे. या दोन्ही परीक्षांचे एकत्र गुण मिळून विद्यार्थ्यांना पास होणे सोपे झालेले आहे. परंतु एकत्रित रित्या पास होण्याकरिता बोर्डाचे काही नियम आहेत.

SSC Board Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता तीन भाषांचे सूत्र

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे विषयाचे 20 गुण मिळत असतात. त्यामध्ये भाषेच्या विषयाकरिता 10 गुण ग्रह पाठाचे, 10 गुण तोंडी परीक्षेची असतात. विज्ञान विषयाकरिता आठ गुण प्रयोगशाळा वही करिता आहेत. प्रयोग करणाऱ्या करिता 12 गुण आहेत. गणित विषयाकरिता 10 गुण वस्तुनिष्ठ उत्तरे दिल्यावर मिळतील त्याचबरोबर 10 गुण गृहपाठाची पकडले जातील. त्रीभाषिक सूत्र नुसार हिंदी इंग्रजी आणि मराठी या तिन्ही विषयांमध्ये मिळून एकूण 105 गुण मिळणे आवश्यक आहे. यामध्ये एका विषयात 25 पेक्षा अधिक किंवा 25 गुण मिळाले तरी चालतील. त्याचप्रमाणे 70 गुण गणित आणि विज्ञान विषय दोन्ही विषय मिळून मिळणे आवश्यक आहे यापैकी कोणत्याही एका विषयात किमान 25 गुण असणे आवश्यक आहे. इतिहास आणि भूगोल या दोन्हीही विषयाकरिता अंतर्गत वीस गुण असतात.

कॉपी मुक्त अभियान राज्यामध्ये फसले

राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पेपर फुटल्याचे प्रमाण दिसून आलेली आहे. त्यामुळे बोर्डाने कॉपी मुक्त अभियान राबवलेले चुकीचे ठरले आहे. त्याचप्रमाणे बोर्डाने राज्यात कुठेही कॉपी प्रकार चालू देणार नाही असे सुद्धा सांगितलेले होते. महाराष्ट्र मध्ये भरपूर ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत. त्यामुळे यावर्षी कॉपी मुक्त अभियान चुकीचे ठरलेले आहे.

SSC Board Exam | परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी काय करावे ?

विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता न करता तणावमुक्त पद्धतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेला उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी आहार वेळेवर घ्यावा. चिंता करू नये किंवा चिंता करत अभ्यास करू नये. विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्य नीट ठेवण्याकरिता संतुलित आहार घ्यावा. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घ्यावी.

आपण 10 वी आणि 12 वी परीक्षा कोणत्या बोर्डाच्या नियमामुळे पास होणार आहोत. हे पाहण्याकरिता टेलिग्राम ग्रुप किंवा ग्रुप जॉईन करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांसोबत संवाद साधावा. मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा केंद्रप्रमुख यांच्यासोबत संवाद साधून आपल्या शंका निरसन कराव्यात.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्यभर सुरू असून, लाखो विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत. परीक्षेचे निकाल आणि विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे निकष बोर्डाच्या ठरवलेल्या नियमांवर आधारित असतात. विशेषतः अंतर्गत मूल्यमापन, लेखी आणि तोंडी परीक्षांचे गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जातात. त्रीभाषिक सूत्रानुसार भाषा विषयांसाठी, तसेच गणित आणि विज्ञानासाठी किमान गुणसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करून तयारी करणे गरजेचे आहे.

यावर्षी काही परीक्षा केंद्रांवर पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने, बोर्डाचे कॉपी मुक्त अभियान प्रभावी ठरले नाही. तरीही, विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता आत्मविश्वासाने आणि नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षा द्यावी. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक किंवा अधिकृत माध्यमांतून योग्य मार्गदर्शन घेणे हे अधिक फायदेशीर ठरेल. परीक्षेच्या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Leave a Comment