Ranveer Allahbadia Controversy | रणवीर अलाबादिया आणि समय रैना या दोघांना तुम्ही ओळखतच असणार आहे. कारण एक लोकप्रिय पॉडकास्ट घेणारा यूट्यूबर आहे तर दुसरा प्रसिद्ध कॉमेडियन आहे. समय रैना याच्या इंडियाज गॉट टॅलेंट या कॉमेडी शोमध्ये रणवीर याने केलेल्या वक्तव्यामुळे तो स्वतः अडचणीत आलेलाच आहे. पण त्याच बरोबर समय रैनाचा हा शो बंद पडण्याच्या मार्गावर आलेला आहे. कारण या कार्यक्रमात होणाऱ्या अश्लील कॉमेडीने समाजातील काही वर्ग खुश असला तरी बहुसंख्य लोक यांनी नाराजी दर्शवलेली आहे. ” अखिल भारतीय सीने वर्कर्स असोसिएशन” या संस्थे कडून सदरील शो बंद करण्याकरिता देशाचे गृहमंत्री अमित शहा व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आलेले आहे . फक्त कार्यक्रम बंद न करता कार्यक्रमातील असणारी पात्र आणि कार्यक्रमाचे निर्देशक आणि निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत . समाजातील सर्वच वर्गातून रणवीरच्या या वाक्यावर संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुधा रणवीरच्या वाक्याचा निषेध करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सिनेमा क्षेत्रातील अभिनेता पुष्कर जोग, श्रेया बुगडे आणि यानंतर तृतीयपंथी अभिनेत्री प्रणित हाटे ने सुद्धा रणवीरच्या या वाक्याचा निषेध नोंदवलेला आहे.
Ranveer Allahbadia Controversy | रणवीर अलाबादिया शो मध्ये नक्की काय बोललेला ?
समय रैना याच्या ” इंडियाज गॉट टॅलेंट ” या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच परीक्षक म्हणून काम पाहण्याकरिता रणवीर अलाबादिया प्रमुख पाहुणा म्हणून आलेला होता. त्यावेळेस त्याने एका स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नामुळे तो चांगलाच अडचणीत आलेला आहे. कारण तो प्रश्न सुद्धा एक अश्लीलतेची मर्यादा पार करून विचारला गेलेला होता. यामध्ये रणवीर ने विचारलेले की, तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना सेक्स करताना पाहायला आवडेल? की तुला त्यांच्यात सामील होऊन ते थांबवायला आवडेल ? शो मध्ये केलेल्या या स्टेटमेंट नंतर देशातील सर्वच नागरिकांमध्ये निषेधाची लाट आली होती. देशातील न्यूज चैनल वरती आणि बऱ्याच यूट्यूब चैनल वर हे व्हिडिओ वायरल करत लोकांपर्यंत पोहोचवले होते. शेवटी हा प्रकार पोलीस स्टेशन पर्यंत गेला. आणि रणवीर आणि शो मधील समय रयना यांच्या विरोधात एफआयआर दाखल झालेली आहे. पोलीस सध्या रणवीर ची चौकशी करत आहेत.
Ranveer Allahbadia Controversy | कोण आहे रणवीर अलाबादिया ?
यूट्यूब पाहणाऱ्यांना देशातील सर्वच लोकांना रणवीर अलाहाबाद या हा माहित आहे. कारण रणवीर हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. बियर बायसेप आणि द रणवीर शो या दोन यूट्यूब चैनल चा तो प्रमुख आहे. त्याचप्रमाणे ” बियर बायसेप मीडिया ” चा डायरेक्टर आहे. विविध क्षेत्रातील यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचे काम रणवीर अलाबादिया यूट्यूब चैनल वर करत असतो. आजपर्यंत रणवीरच्या शोमध्ये बॉलिवूड, राजकीय, सामाजिक, आरोग्य, क्रीडा, धार्मिक क्षेत्रातील बरेच यशस्वी लोक आलेली आहेत. रणवीर यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती 45 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. रणवीर यांच्या यूट्यूब चॅनलला 1 कोटी पेक्षा अधिक लोकांनी सबस्क्राईब केलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रणवीर याला मागील वर्षी गौरवण्यात आलेले होते.
Ranveer Allahbadia Controversy | इंडियाज गॉट टॅलेंट शो काय आहे ?
इंडियाज गॉट टॅलेंट हा एक समय यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला अश्लील कॉमेडी शो आहे. यामध्ये प्रेक्षक शो चे तिकीट काढून हा शो बघायला येऊ शकतात. यामध्ये समय रयना आणि इतर चार ते पाच लोक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असतात. स्पर्धक या शोमध्ये भाग घेत असतो. ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्याला पुढे स्टेजवर बोलावले जाते आणि त्याला स्वतःतील टॅलेंट दाखवण्याचा चान्स दिला जातो. स्पर्धकाने केलेल्या वक्तव्यावर पर्यवेक्षकांशी अश्लील टिप्पणी करून त्याची खिल्ली उडवण्यात येते. आणि त्याद्वारे हशा पिकून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते.