10th Paper Leak | पेपर फुटीमुळे सर्वच हैराण.. सर्व प्रयत्न केले तरी दहावीचा पेपर फुटला.

10th Paper Leak


10th Paper Leak | सध्या 10वी आणि बारावीचे बोर्ड चे पेपर सुरू आहेत. या पेपर दरम्यान पेपर फुटीचे किंवा कॉपीचे प्रमाण रोखण्याकरिता यंत्रणेला यश येत नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागाची सात पथके यासाठी तैनात आहेत. त्याचप्रमाणे महसूल विभागाची 10 भरारी पथके पेपर फुटीचे आणि कॉफीचे प्रकार रोखण्यासाठी काम करत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुखांच्या नेमणुका केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर भेट देणार असल्याचे सांगितलेले आहे. बऱ्याच परीक्षा केंद्र वरती मल्टिपल चॉइस क्वेश्चन ची उत्तरे सांगण्याचे प्रकार घडत असल्यामुळे ज्या परीक्षा केंद्रावर असे प्रकार घडतील त्या परीक्षा केंद्रावर काम करणाऱ्या पर्यवेक्षक, केंद्र संचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षेचा पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर जिल्हा परिषद शाळा बदनापूर या केंद्रावर कुठल्या असल्याची चर्चा सर्वत्र होती. त्यानंतर लगेच तहसीलदार, शिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर ठाण मांडली आणि अहवाल प्राप्त केल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेचा पेपर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा फुटल्याची माहिती समाज माध्यमांवर सांगण्यात आलेले आहे.

10 वी आणि 12 वी परीक्षा सुरू झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर हा विभाग एक महत्त्वाचा विभाग आहे. या विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये मिळून 644 परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत. या परीक्षा केंद्रांवर ती 1,88,776 विद्यार्थी दहावीची परीक्षा देण्याकरिता येत आहेत. या परीक्षा केंद्रांवर ती लक्ष ठेवण्याकरिता व्यवस्थेकडून व्हिडिओ शूटिंग, पोलीस बंदोबस्त, बैठे पथक या यंत्रणांना कामाला लावण्यात आलेली आहे. एवढी सर्व व्यवस्था काम करत असताना सुद्धा परीक्षांमधील कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणाला आळा बसलेला नाही. बदनापूर जिल्हा परिषद शाळा या जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची चर्चा समाज माध्यमांवरती आहे. एवढ्या सर्व यंत्रणा काम करत असताना सुद्धा पहिल्याच दिवशी पेपर फुटला यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून शिक्षणाधिकारी यांना परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आलेले आहे. जर त्यांच्या चौकशीमध्ये कोणताही गैरप्रकार आढळला तर त्या परीक्षा केंद्रावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे.

10th Paper Leak | कारवाई कधी केली जाणार ?

जर कोणत्याही परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचा किंवा कॉपीचा प्रकार घडला तर त्या परीक्षा केंद्राला बडतर्फ करणे, गुन्हा दाखल करणे, मान्यता रद्द करणे अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ही कारवाई होण्याकरिता त्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झालेली कोणतीही घटना केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. वैशाली जामदार विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे.

10th Paper Leak | जिल्हाधिकाऱ्यांचे मत काय आहे ?

पेपरफुटीच्या घटनेचा तपास केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की दहावीचा पेपर फुटल्याची माहिती चुकीची आहे. समाज माध्यमांवर जो पेपर वायरल केलेला होता तो वेगळा पेपर होता. उत्तर पत्रिका म्हणून फॉरवर्ड करण्यात आलेले कोणतेही मेसेज मूळ प्रश्नपत्रिका चे उत्तर पत्रिका म्हणून नव्हते. त्याचप्रमाणे एका पालकांनी त्या ठिकाणी दगड फेकलेला होता त्या पालकावर कारवाई केली जाणार सर्व परीक्षा केंद्रावर ती कडक बंदोबस्त केलेला आहे. अशी माहिती जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेली आहे.

10th Paper Leak | पेपर फुटीचे नक्की प्रकरण काय ?

जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणी 10 वीचा पहिला मराठीचा पेपर फुटला असल्याची चर्चा समाज माध्यमांवर होती. पेपर सुरू होताच 15 मिनिटानंतर शहरातील झेरॉक्स सेंटर मधून प्रश्नांची उत्तरे प्रिंट काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे प्रकार समोर आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्व परीक्षा केंद्रांवरती शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर सुरू झाला होता. सकाळी 11:00 वाजता पेपर सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर आली. त्या प्रश्नांच्या उत्तर पत्रिका तयार करून झेरॉक्स सेंटर वरून झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची चर्चा आता सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे आता परीक्षा पुन्हा होणार की दहावीचा पेपर रद्द करणार याबाबत शिक्षण मंडळ काय भूमिका घेणार ? यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment